उपराष्ट्रपती कार्यालय
एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
Posted On:
28 SEP 2023 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2023
ख्यातनाम कृषि शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजमाध्यमावरील संदेशातून त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
X वरील पोस्टमध्ये उपराष्ट्रपतीनी लिहिले आहे;
“भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ एम. एस. स्वामिनाथन’जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. भारतीय कृषीक्षेत्रात त्यांनी केलेल्या आमूलाग्र योगदानामुळे देशात अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली तसेच लक्षावधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी देखील त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना.”
* * *
M.Pange/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1961816)