युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी युवा विभागाच्या वार्षिक क्षमता विकास योजनेचा (एसीबीओई) आणि 'युथ अॅज चेंजमेकर', या सक्रीय नागरिकत्व अभ्यासक्रमाचा केला शुभारंभ
Posted On:
27 SEP 2023 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे युवा विभागाच्या वार्षिक क्षमता विकास योजनेचा (एसीबीओई) आणि 'युथ अॅज चेंजमेकर', या सक्रीय नागरिकत्व अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला.
भारत सरकारने नव्या भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरून, योग्य प्रवृत्ती, कौशल्य आणि ज्ञानाने समृद्ध असलेली भविष्यासाठी सज्ज नागरी सेवा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मिशन कर्मयोगी’ अभियान सुरु केले आहे.
या मिशन अंतर्गत, कौशल्य विकास आयोगाने (सीबीसी), युवा व्यवहार विभागाच्या अधिकार्यांसाठी वार्षिक क्षमता विकास योजना (एसीबीओई) आणि युवा वर्गासाठी 'युथ अॅज चेंजमेकर', हा सक्रीय नागरिकत्व अभ्यासक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमाने भारतातील गतिशील तरुण लोकसंख्येमध्ये सक्रिय नागरिकत्व आणि नेतृत्व गुण वाढवण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
वार्षिक क्षमता विकास योजना, विभागीय अधिकार्यांच्या नियम-आधारित कार्यपद्धतीचे भूमिका-आधारित कार्यपद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे, त्यांच्या जबाबदाऱ्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना सुसंगत करणे, आणि लोक-केंद्रित प्रशासनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करते.
प्रशासनातील युवा कर्मचाऱ्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी हा अभ्यासक्रम युवा पोर्टलवर प्रसारित केला जाईल, डिजिटल स्वयं-शिक्षण मॉड्यूल्समध्ये 21 व्या शतकातील कचरा व्यवस्थापन, हवामान बदल आणि लैंगिक समानता यासारख्या इतर महत्वाच्या समस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची 16 मॉड्यूल्स असून, इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये ती उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम युवकांना केवळ एकविसाव्या शतकातील आव्हाने समजून घेण्यासाठी सुसज्ज करणार नाही, तर सक्रिय आणि सहभागी नागरिकत्वासाठी आवश्यक असलेली सामाजिक उद्योजकता आणि आर्थिक साक्षरता यासारखी कौशल्ये देखील प्रदान करेल.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961489)
Visitor Counter : 111