राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Posted On: 27 SEP 2023 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे:

“मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिवसाच्या स्मरणार्थ साजऱ्या केल्या जाणाऱ्या मिलाद-उन-नबी निमित्त मी सर्व देशवासीयांना, विशेषत: आपल्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना माझ्या स्नेहमय शुभेच्छा देते.

मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतता आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांची शिकवण आपल्याला सद्भावनेने आणि बंधुभावाने जगण्याची प्रेरणा देते.

त्यांच्या आदर्शांचे स्मरण करून मानवतेच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करूया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961453) Visitor Counter : 97