विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

टाटा मेमोरियल सेंटर मुंबईशी  संलग्न असलेल्या, जम्मू - काश्मिरमधील पहिल्या अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा केंद्राचे, डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ग्रँड मेडिकल कॉलेज कठुवा इथे उद्घाटन;  किफायतशीर दरात सहज उपलब्ध होणारी आरोग्य सेवा प्रदान करणे हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निरोगी भारत घडवण्याचा उत्तम मार्ग, असे व्यक्त केले मत


संकटकालीन व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमधील आदर्श म्हणून भारताची ओळख: डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 24 SEP 2023 4:42PM by PIB Mumbai

 

टाटा मेमोरियल सेंटर मुंबईशी संलग्न असलेल्या, जम्मू आणि काश्मिरमधील पहिल्या अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा केंद्राचे, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)डॉ जितेंद्र सिंह यांनी कठुवा इथल्या ग्रँड मेडिकल कॉलेज-जीएमसी, या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीत उद्घाटन केले. जम्मू काश्मिर, पंजाब, तसेच हिमाचल प्रदेश या राज्यांना या सुविधेचा लाभ होईल असे ते यावेळी म्हणाले.

मंत्री म्हणाले की दररोज सकाळी या प्रदेशातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या कर्करुग्णांच्या अगतिक  कुटुंबियांकडून, कर्करुग्णाला टाटा रुग्णालयात दाखल करण्यासाठी किंवा रुग्णासोबत असणाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठीच्या विनंतीपर फोनमुळे त्यांच्या अगतिकतेमुळे वाईट वाटत असे. म्हणूनच त्यांनी मग कठुआ इथे टाटा संलग्न उपचार सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे टाटा मेमोरियल सेंटर मुंबईचे नियंत्रण प्राधिकरण असलेल्या अणुऊर्जा विभागा अंतर्गत याबाबत प्रशासकीय कार्यवाही केली.

वाढते आयुर्मान, बदलती जीवनशैली, पर्यावरणीय घटक यांच्यामुळे कर्करोगाचे प्रमाण एखाद्या साथीच्या रोगांप्रमाणे वाढत असून, सर्व प्रकारचे आणि सर्व अवयवांचे कर्क रुग्ण सर्वत्र आढळून येत आहेत  असे डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले. त्यामुळेच कठुवात सुरू केलेले टाटा उपग्रह कर्करोग उपचार सुविधा केंद्र, या क्षेत्रातील लोकांसाठी एक मोठे वरदानच ठरणार आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, उपग्रह रुग्णालये आणि टाटा मेमोरियल सेंटरची सुविधा देशाच्या विविध भागात सुरू करण्यात आली आहे आणि गुवाहाटीमध्ये तर Onco DM आणि Mch सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम  नंतर कठुआमध्ये देखील सुरु करण्याचे विचाराधीन आहे.

जीएमसी कठुआ इथे अत्यावश्यक डे-केअर केमोथेरपी युनिट, 300  एलपीएम ऑक्सिजन सयंत्र  आणि प्रसूती अतिदक्षता विभागाच्या उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या समुहाला डॉ. जितेंद्र सिंह  संबोधित करत होते.

विविध प्रकारच्या कर्करोगावरील उपचारांबाबत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, देशातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र वेगाने वाढत असल्यामुळे, भारताने 'CERVAVAC' सारख्या प्राणघातक रोगांच्या निवारणासाठीच्या लस निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे.  2025 पर्यंत भारत 150 अब्ज अमेरिकी डॉलर्सची जैव-अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या बेतात आहे, जी 2022 मध्ये 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त होती.

किफायतशीर दरात सहज उपलब्ध होणारी आरोग्य सेवा प्रदान करणे हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निरोगी भारत घडवण्याचा उत्तम मार्ग आहे, असे मतही डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या वेळी व्यक्त केले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारत आरोग्य सेवापुरवठ्याच्या  क्षेत्रीय आणि केवळ विभाग या  मानसिकतेतून, व्यापक गरजांवर आधारीत सर्वंकष अशा आरोग्य सेवापुरवठ्याकडे  वळला आहे आणि आता संकटकालीन व्यवस्थापन तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमधील आदर्श म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.

देशात प्रथमच, ‘प्रतिबंधात्मक आरोग्य सेवाकेंद्रस्थानी आणल्याबद्दल, डॉ जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  आभार मानले, कारण यामुळेच केवळ दोन वर्षांच्या कालावधीत भारत दोन डीएनए लसी आणि एक नाकावाटे देण्यात येणारी लस तयार करू शकला, असे त्यांनी सांगितले.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960190) Visitor Counter : 114