संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाची युद्धनौका 'सह्याद्री'चा,पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावामध्‍ये सहभाग

Posted On: 22 SEP 2023 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2023

भारतीय नौदलाच्या हिंद प्रशांत क्षेत्रात तैनात असलेल्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सह्याद्री या युद्धनौकेने 20 - 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल (RAN) आणि इंडोनेशियन नौदल यांची जहाजे आणि विमानांसमवेत झालेल्या पहिल्या त्रिपक्षीय सागरी भागीदारी सरावात भाग घेतला.

या त्रिपक्षीय सरावाने तीन सागरी राष्ट्रांना त्यांची भागीदारी मजबूत करण्याची तसेच हिंद - प्रशांत क्षेत्राला स्थिर, शांततापूर्ण आणि सुरक्षित करण्यासाठी या देशांची सामूहिक क्षमता सुधारण्याची संधी दिली. या सरावाने सहभागी नौदलांना एकमेकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा लाभ घेण्याची संधीही उपलब्ध करून दिली. नौदलकर्मींच्या प्रशिक्षणासाठी आणि परस्पर समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने जटिल सामरिक आणि पावित्रात्मक कसरती, क्रॉस-डेक भेटी आणि हेलिकॉप्टरचे क्रॉस-डेक लँडिंग सारखे उपक्रम आयोजित केले गेले होते.

आयएनएस सह्याद्री हे स्वदेशी बनावटीचे आणि प्रोजेक्ट-17 क्लास मल्टीरोल स्टेल्थ फ्रिगेट्स अंतर्गत निर्मित तिसरे जहाज मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेड येथे बांधले गेले असून कॅप्टन राजन कपूर याचे नेतृत्व करत आहेत.

 

S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959766) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil