पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे करणार उद्घाटन
देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषदेचे आयोजन
‘न्याय वितरण प्रणालीपुढील उदयोन्मुख आव्हाने’ संकल्पनेवर होणार परिषद
प्रविष्टि तिथि:
22 SEP 2023 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे उद्घाटन करतील. पंतप्रधान या परिषदेला मार्गदर्शनही करतील.
23-24 सप्टेंबर, 2023 रोजी होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 चे आयोजन बार कौन्सिल ऑफ इंडिया ने केले आहे. ‘न्याय वितरण प्रणाली पुढील उदयोन्मुख आव्हाने’ ही या परिषदेची संकल्पना आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या विविध कायदे विषयक मुद्द्यांवर अर्थपूर्ण संवाद आणि चर्चा, कल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणे आणि कायदेविषयक मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामंजस्य मजबूत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. देशात प्रथमच आयोजित होत असलेल्या या परिषदेत, कायदे क्षेत्रातील नवीन घडामोडी आणि पद्धती, सीमापार खटल्यांपुढील आव्हाने, कायदे विषयक तंत्रज्ञान, पर्यावरण कायदा आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या परिषदेत देशातील नामवंत न्यायाधीश, विधी क्षेत्रातील व्यावसायिक, आणि जागतिक पातळीवरील कायदे तज्ञ सहभागी होतील.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1959630)
आगंतुक पटल : 673
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam