उपराष्ट्रपती कार्यालय
संसदेच्या नवीन इमारतीमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी केलेले पहिले भाषण
Posted On:
19 SEP 2023 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2023
आपल्या सर्व थोर व्यक्तींना गणेश चतुर्थीच्या या शुभप्रसंगी शुभेच्छा !
अमृतकाळात झालेला हा बदल भारताच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी अर्थपूर्ण सिद्ध होईल.
माननीय सदस्य आजच्या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे जैन समाजामध्ये आज समाज संवत्सरी दिवस साजरा केला जातो जो पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस असतो याप्रसंगी माझ्याकडून सर्वांना ‘मिच्छामी दुक्कड़म’.
मी आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून कळत नकळतपणे किंवा कुठल्याही प्रकारे मी कोणाच्या भावनेला धक्का पोहोचवला आहे, दुःख दिले असेल तर मी माफीसाठी पात्र आहे. आपले हृदय विशाल आहे आणि आपण मला माफ कराल आणि पुढचा प्रवास आपल्या सर्वांसाठी एकत्रितपणे सकारात्मक होईल. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. भारताची प्रगती ही सर्व जगासाठी एक उदाहरण आहे आणि आपला प्रयत्न असला पाहिजे की येणाऱ्या दिवसांमध्ये या प्रगतीला आपण अधिक गती देऊ आणि या कार्यात महत्वपूर्ण योगदान देऊ.
माननीय सदस्य आजच्या दिवशी माझी आपल्या सर्वांना विशेष विनंती आहे की आपल्या सर्वांना असा संकल्प घेतला पाहिजे की आपण देशाला आणि देशहिताला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे आपणाला आपण भारतीय असल्याचा अभिमान असला पाहिजे आणि आपण भारताच्या ऐतिहासिक वारशाचा आदर केला पाहिजे.
मला पूर्णपणे विश्वास आहे की आजची ही नवीन सुरुवात भारताच्या भविष्यासाठी दूरगामी आणि अर्थपूर्ण सिद्ध होईल.
आपल्याला प्रत्येक गोष्टीतले सर्वोत्तम असे पुढे नेले पाहिजे आणि, अनावश्यक ते सर्वकाही मागे सोडले पाहिजे.
देशाची सेवा करण्यासाठी आणि मानवतेच्या एक षष्ठांश लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण आपली संपूर्ण वचनबद्धता पाळली पाहिजे.
मी माननीय सदस्यांना सूचित करू इच्छितो की सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आणि मी माननीय सभापतींबरोबर संवाद साधल्यानंतर आज सकाळी ज्या सेंट्रल हॉलमध्ये आपले संयुक्त अधिवेशन होते ते यापुढे 'संविधान सदन' म्हणून ओळखले जाईल.
मला आनंद आहे की मी आज सकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेट देण्यासाठी सभागृह तहकूब केले आणि यावर व्यापक एकमत झाले. आपण अशी परिस्थिती निर्माण करू ज्या माध्यमातून आपण सर्वकाही अत्यंत प्रभावी बनवू शकू.
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958919)
Visitor Counter : 138