उपराष्ट्रपती कार्यालय

संसद भवनाच्या ऐतिहासिक इमारतीचा निरोप घेण्यासाठी संसद सदस्य मध्यवर्ती सभागृहात उपस्थित


नव्या संसद भवनात जाणे म्हणजे नियतीकडून आधुनिकतेकडे जाण्याचा प्रवास – उपराष्ट्रपती

संसद भवनाची नवी वास्तू म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या उदयाचा करार – उपराष्ट्रपती

राष्ट्राचे हित सर्वोच्च मानून विरोधात उभे ठाकण्याच्या भूमिकेलाही निरोप देण्याचे उपराष्ट्रपतींचे सदस्यांना आवाहन

नव्या संसद भवनातील सभागृहांना आपल्या लोकशाहीच्या मंदिरातील पवित्र गाभारा बनवण्याचे उपराष्ट्रपतींचे कळकळीचे आवाहन

Posted On: 19 SEP 2023 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2023

 

संसद भवनाच्या नव्या इमारतीत जाण्यापूर्वी भारतीय संसद भवनाच्या ऐतिहासिक वारसारूपी वास्तूला अभिवादन करण्यासाठी मध्यवर्ती सभागृहात संसदेचे सदस्य एकत्र आले होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी खासदारांना संबोधित केले. नव्या संसद भवनात जाणे म्हणजे नियतीकडून आधुनिकतेकडे जाण्याचा प्रवास असल्याचे सांगून वर्ष 2047 मधील भारताच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना केले.

संसद भवनाची ही ऐतिहासिक वास्तू गेल्या सात दशकांच्या दीर्घ प्रवासात अब्जावधी भारतीयांच्या हृदयातील आकांक्षांनी भारलेली राहिली आणि अनेक मैलाचे दगड गाठण्याला साक्षीदार ठरली, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

संसद भवनाची नवी वास्तू ही रचनाशास्त्राचा आविष्कार आहे, मात्र त्याचबरोबर  आत्मनिर्भर भारताच्या उदयाचा करार आहे. भारतीय संस्कृतीतील वैविध्याचे प्रतिबिंब या वास्तूत दिसत असून राष्ट्राचा अभिमान, एकता आणि विविधतेचे ती चिन्ह आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

संविधान समितीच्या कारभारादरम्यान शिष्टाचार आणि उत्पादक वादविवादांचा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी आपल्या संस्थापकांच्या आदर्श वागणुकीचे अनुकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

संसदेच्या कामकाजातील अडथळे लोकशाही मूल्यांना मारक असल्याचे सांगून राज्यसभेच्या अध्यक्षांनी नव्या संसद भवनात सदस्यांकडून सहकार्य आणि सहमतीच्या भूमिकेची अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्राचे हित सर्वोच्च मानण्याचा संकल्प सोडून नव्या संसद भवनातील सभागृहांना आपल्या लोकशाहीच्या मंदिरातील पवित्र गाभारा बनवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी सर्व सदस्यांना केले.

अलिकडच्या काळात भारताने उभारलेल्या पायाभूत सुविधा जसे की नवे संसद भवन, भारत मंडपम आणि यशोभूमी हे जागतिक दर्जाचे यश असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.  भारताचे भविष्य घडवण्यात या वास्तू प्रमुख भूमिका बजावतील, असे त्यांनी सांगितले.

जागतिक शांतता, हवामानविषयक कृती आणि विकसित राष्ट्रांच्या बरोबरीचा आर्थिक विकासाचा प्राधान्यक्रम मांडणारा देश म्हणून भारत जगासमोर आल्याचा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी चाणाक्ष नीती, जनकेंद्रीत दृष्टी, अढळ समर्पणातून जी20 शिखर परिषदेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या नेतृत्वाची प्रशंसा केली.  धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार नोकरशाही आणि विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे खासदार उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण : https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1958759

 

* * *

S.Patil/R.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958918) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil