अर्थ मंत्रालय
सीबीडीटी ने 2023-24 मूल्यांकन वर्षासाठी अर्ज 10B/10BB आणि अर्ज आयटीआर -7 सादर करण्याची अंतिम तारीख वाढवली
Posted On:
18 SEP 2023 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2023
आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्ज 10B/अर्ज 10BB मध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 30.09.2023 होती. ती आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिनांक 31.10.2023 पर्यंत वाढवली आहे.
मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी अर्ज ITR-7 मध्ये प्राप्तिकर परताव्यासाठी आर्थिक विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31.10.2023 होती ती देखील 30.11.2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
दिनांक 18.09.2023 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 225/177/2023/ITA-II मध्ये जारी केलेले परिपत्रक क्रमांक 16/2023 द्वारे ही माहिती दिली आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1958650)
Visitor Counter : 211