कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या उद्देशाने परिवर्तनशील उपक्रमांच्या मालिकेचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन


कृषी-कर्ज आणि पीक विमा यावर केंद्रित उपक्रमांचा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून होणार प्रारंभ

Posted On: 18 SEP 2023 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2023

 

शेतक-यांचे कल्याण केंद्रस्थानी ठेवून कृषी कर्ज (किसान क्रेडिट कार्ड आणि बाजार हस्तक्षेप योजना) आणि पीक विमा (पंतप्रधान पीक विमा योजना / हवामान आधारित पीक विमा योजना) यावर  केंद्रित  परिवर्तनशील उपक्रमांच्या मालिकेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते उद्या  होणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारतातील कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी हे उपक्रम सुरू करत आहे.  आर्थिक समावेशनात वाढ करणे, माहितीचा  सुव्यवस्थित  वापर करणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि कृषी समुदायाच्या उपजीविकेचा साधनांमध्ये वाढ करणे हे या मागचे  उद्दिष्ट आहे.शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यावर आणि कृषी परिवर्तनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम सेवा वितरणासाठी भारत सरकारच्या  वचनबद्धतेचे  हे उपक्रम द्योतक आहेत.

उपक्रमांची ठळक वैशिष्ट्ये :

1. किसान ऋण पोर्टल (केआरपी)

किसान ऋण पोर्टल (केआरपी), हे अनेक सरकारी विभागांच्या सहकार्याने विकसित केले गेले असून किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) अंतर्गत कर्ज सेवांच्या उप्लब्धतेमध्ये  क्रांती घडवून आणण्यासाठी ते  सज्ज आहे. हा डिजिटल मंच  शेतकऱ्यांबद्दलची माहिती, कर्ज वितरण तपशील, व्याज सवलतीचे दावे आणि योजनेच्या वापरातील प्रगतीचे सर्वसमावेशक दृश्य प्रदान करते आणि अधिक केंद्रित आणि कार्यक्षम कृषी कर्जासाठी बँकांसोबत विनाअडथळा  एकात्मीकरण  वाढवते.

2. घर-घर केसीसी अभियान: घरोघरी केसीसी अभियान

देशभरातील  प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी ) योजनेचा लाभ पोहोचवण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम "घरोघरी केसीसी अभियान" ची सुरुवात या कार्यक्रमात  होणार आहे.  सार्वत्रिक आर्थिक समावेशन साध्य करणे, प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या कृषी व्यवसायांना चालना देणार्‍या पत सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून देणे सुनिश्चित करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

3. डब्ल्यूआयएनडीएस  माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

या कार्यक्रमादरम्यान प्रकाशित करण्यात येणारी डब्ल्यूआयएनडीएस  माहितीपुस्तिका, हवामान माहिती नेटवर्क माहिती प्रणाली (डब्ल्यूआयएनडीएस) उपक्रमाचा प्रभाव वाढवते. या सर्वसमावेशक माहितीपुस्तिकेच्या माध्यमातून शेतकरी, धोरणकर्ते आणि विविध कृषी घटकांना पोर्टलच्या कार्यक्षमतेची सखोल माहिती, माहितीचे विवेचन  आणि प्रभावी वापर यांसारखी माहिती मिळणार आहे. 

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1958616) Visitor Counter : 236