अंतराळ विभाग
चांद्रयानचे यश साजरे करत असताना, भारत त्याचवेळी विविध क्षेत्रीय विकास प्रकल्पांमध्ये अवकाश तंत्रज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांचा वापर करत आहे - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
“अंतराळ तंत्रज्ञानाने आज आभासी माध्यमातून भारतीय घराघरात प्रवेश केला आहे - डॉ जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
18 SEP 2023 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2023
चांद्रयानचे यश साजरे करत असताना, भारत त्याचवेळी विविध क्षेत्रीय विकास प्रकल्पांमध्ये अवकाश तंत्रज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांचा वापर करत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. "जैववैद्यकीय विज्ञानात चांद्रयान-3 यशाचे अनुकरण" या विषयावरील विशेष सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. अंतराळ तंत्रज्ञानाने आज आभासी माध्यमातून भारताच्या घराघरात प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले.

हवामानाचा अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधांचा विकास, रेल्वे मार्ग आणि मानवरहित रेल्वे फाटकाचे व्यवस्थापन, रस्ते आणि इमारती, टेलीमेडिसिन, प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘स्वामित्व’ ही जीपीएस आधारित जमिनीचे मॅपिंग योजना यासांरख्या क्षेत्रांसह जवळपास सर्वच क्षेत्रात अंतराळ अनुप्रयोगांचा उपयोग केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
“गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये आपण जगाला दाखवून दिले आहे की, क्षेत्रीय विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञान आणि त्याचे वैज्ञानिक अनुप्रयोग कशाप्रकारे वापरले जाऊ शकतात... यातून निर्माण होणार्या प्रचंड, अनुषंगिक सकारात्मक गोष्टी आपल्या मुला-मुलींना समजावून सांगायच्या आहेत. ” असे त्यांनी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्वादुपिंडशास्त्र संस्थेला संबोधित करताना सांगितले.

किफायतशीर मार्गाने पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात चांद्रयान-3 अलगदपणे उतरवून भारताची तांत्रिक क्षमता आणि प्रतिभा जगासमोर आली आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. चांद्रयान-1 मोहिमेद्वारे खनिज घटक जसे सल्फर, कोबाल्ट, हायड्रोजन आणि पाण्याच्या रेणूंसारखे पुरावे सापडले होते, काही नवीन निष्कर्षांची अपेक्षा ठेवून जगभरातील संपूर्ण वैज्ञानिक समुदाय यावर संशोधन करत आहे., असे त्यांनी सांगितले.
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1958591)
आगंतुक पटल : 136