विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

डॉ. जितेंद्र सिंह यांनी एसएमव्हीडी नारायणा हेल्थकेअर क्षयरोग मुक्त एक्सप्रेस (चला क्षयरोगाला हरवू या ) ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना


2025 पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकात्मिक धोरणासह सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) आवश्यक - डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 17 SEP 2023 2:11PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2025 पर्यंत भारताला 'क्षयरोग मुक्त करण्याच्या वचनबद्धतेपासून प्रेरित असलेला 'क्षयरोग मुक्त भारत' साध्य करण्यासाठी एकात्मिक धोरणासह सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.

'चला क्षयरोगाला हरवूया' या घोषणेसह उधमपूर येथून एसएमव्हीडी नारायणा हेल्थकेअर क्षयरोग मुक्त एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर डॉ जितेंद्र सिंह बोलत होते .

2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनासाठी भारत करत असलेले प्रयत्न जगासमोर आदर्श असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले. लोकसहभागाच्या खर्‍या भावनेने क्षयरोग निर्मूलनासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन सिंह यांनी केले.

क्षयरोगामुळे खोलवर होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम लक्षात घेता, शासनाने 2025 पर्यंत 'क्षयरोग मुक्त भारत' साध्य करण्याला उच्च प्राधान्य दिले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी एकात्मिक सर्वांगीण आरोग्य सेवा दृष्टीकोनात जैवतंत्रज्ञान महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

खाजगी क्षेत्राचा सहभाग, सक्रिय रुग्ण शोध, आरोग्य आणि कल्याण केंद्रांद्वारे सेवांचे विकेंद्रीकरण, सामुदायिक सहभाग आणि नि-क्षय पोषण  योजना यासारख्या धोरणांनी भारताच्या क्षयरोग व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये मोठे परिवर्तन घडवून ते रुग्ण केंद्रित बनवले आहे, असे सिंह म्हणाले.

या कार्यक्रमात, 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने डॉ. जितेंद्र सिंह यांनी दत्तक घेतलेल्या त्यांच्या मतदार संघातील क्षयरुग्णांना दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या किटचे वाटप केले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1958189) Visitor Counter : 79