उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवीन संसद भवनाच्या गजद्वारासमोर उपराष्ट्रपतींनी राष्ट्रध्वज फडकावला


हा एक ऐतिहासिक क्षण आणि विकासाच्या प्रवासातला एक मैलाचा दगड - उपराष्ट्रपती

भारत हा युगानुयुगे बदलाचा साक्षीदार - उपराष्ट्रपती

"भारताचे सामर्थ्य, पराक्रम आणि योगदान जगाने ओळखले आहे" - उपराष्ट्रपती

Posted On: 17 SEP 2023 12:56PM by PIB Mumbai

 

भारताच्या गौरवशाली वारशापासून अमृत काळामधील एका नवीन अध्यायाची नव्याने सुरुवात करताना, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी आज नवीन संसद भवनाच्या गज द्वारासमोर राष्ट्रध्वज फडकावला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही यावेळी उपस्थिती होते.

हा एक ऐतिहासिक क्षण असून भारताच्या विकास प्रवासातला एक मैलाचा दगड ठरणारा हा क्षण आहे असे  गौरवउद्गार काढून उपराष्ट्रपती म्हणाले की, भारत युगानुयुगे बदलाचा साक्षीदार ठरलेला आहे आणि जगाला भारताचे सामर्थ्य, पराक्रम आणि योगदानाची ओळख पटलेली आहे.

"आपण सध्या अशा काळात जगत आहोत जिथे आपण अशा विकास कार्याचे आणि यशाचे साक्षीदार ठरलेलो आहोत ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आज आपले खरे वास्तव जागतिक स्तरावर अत्यंत सकारात्मक पद्धतीने प्रतिबिंबित होत आहे," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रीय मंत्री, विविध राजकीय पक्षांचे संसद सदस्य, राज्यसभा आणि लोकसभेचे महासचिव देखील उपस्थित होते.

***

M.Iyengar/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958165) Visitor Counter : 137