वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
अभियांत्रिकी सेवा, डिझाइन, बांधकाम आणि संशोधन आणि विकास यामध्ये 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अभियांत्रिकी समुदायाला केले प्रोत्साहित
Posted On:
15 SEP 2023 2:16PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी अभियांत्रिकी समुदायाला अभियांत्रिकी सेवा, डिझाइन, बांधकाम आणि संशोधन आणि विकास या मध्ये सन 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स निर्यात लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहित केले. आज नवी दिल्ली येथे “डिझाईन, अभियांत्रिकी, बांधकाम, संशोधन आणि विकास आणि पर्यावरण सेवा यासंदर्भात जागतिक सेवा निर्यात परिषद : शाश्वत ऊर्जा, वाहतूक आणि पायाभूत सुविधा” ला संबोधित करताना, गोयल यांनी अभियंता दिनानिमित्त देशभरातील अभियंत्यांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 शिखर परिषद 2023 च्या यशस्वी आयोजनातून जागतिक स्तरावर देशाचा वाढता दबदबा दिसून आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जी 20 शिखर परिषदेच्या 2023 च्या पहिल्या दिवशी महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णयांसह जी 20 नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारण्यात आल्याने भारताच्या क्षमता आणि नेतृत्वाची जगाला ओळख झाली आहे, असेही ते म्हणाले. भारताचा आवाज केवळ ग्लोबल साउथचाच नाही तर आता जगाचा आवाज बनत आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी, नवीन बाजारपेठा काबीज करण्यासाठी आणि ‘STEM’ (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी किंवा गणित) पदवीधरांच्या भारतातील विपुल प्रतिभेचा फायदा घेऊन त्यांच्या क्षेत्रातील आघाडीच्या जागतिक कंपन्या बनण्याचे आवाहन पीयूष गोयल यांनी केले.
गोयल यांनी अभियांत्रिकीमध्ये विशिष्ट क्षेत्रातील ‘ नैपुण्य आणि प्रमाणीकरणाच्या जर्मन मॉडेलचा विचार करण्यास प्रोत्साहित केले आणि असे सुचवले की, अभियांत्रिकी क्षेत्रातील विशेषज्ञ आणि बहुतज्ञ भारताच्या वाढीसाठी आणि नवकल्पनांमध्ये योगदान देऊ शकतात.
याशिवाय, पीयूष गोयल यांनी जागतिक प्रकल्पांमध्ये भारतीय अभियांत्रिकी कंपन्यांचा सहभाग मर्यादित ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय पद्धतींबाबत संशोधनात्मक अभ्यास करण्याचे आवाहन सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद आणि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) (IEI) यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतीय अभियंते आणि व्यवसायांसाठीही समान संधी सुनिश्चित करण्यासाठी या संशोधन अभ्यासाच्या आधारे परस्परावलंबी कृतीसाठी शोध घेईल, यावर मंत्र्यांनी भर दिला.
मंत्री गोयल यांनी अभियंता दिन साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि यातून व्यक्ती आणि राष्ट्राला अधिक उंची गाठण्यासाठी प्रेरणा मिळते यावर भर दिला.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957819)
Visitor Counter : 140