माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मेरी माटी मेरा देश मोहीम ही आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना वाहिलेली आदरांजली आहे : अनुराग सिंह ठाकूर
मुंबईत नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित अमृत कलश यात्रेचे, केंद्रीय माहिती प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
15 SEP 2023 5:19PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी आज मुंबईत मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत, मुंबईच्या नेहरू युवा केंद्राने आयोजित केलेल्या अमृत कलश यात्रेचे उद्घाटन केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे अधिकारी, इतर मान्यवर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन एस एस) स्वयंसेवक उपस्थित होते. या सोहळ्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृती प्रित्यर्थ आणि आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेल्या शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी म्हणून सर्वांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी मंत्री महोदयांनी, युवावर्गाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान द्यावे, असेही आवाहन केले.

भारतभरातून गोळा केलेल्या या पवित्र मातीतूनच दिल्लीत युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटिका साकार होईल, असे ते म्हणाले. आपल्या वीर स्वातंत्र्यसैनिकांना आपण यापेक्षा अधिक भावपूर्ण आदरांजली अर्पण करू शकणार नाही, असेही केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी 2047 पर्यंत समृद्ध भारत घडवण्यासाठी स्वतःला झोकून देण्याचे आवाहनही अनुराग ठाकूर यांनी यावेळी केले.

***
S.Tupe/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957798)
Visitor Counter : 190