कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या सक्षम नेतृत्वाखाली निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाला मिळाला मंत्रालय/विभागांच्या श्रेणीतील पहिला प्रतिष्ठित राजभाषा कीर्ती पुरस्कार, 2022-23
सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखालील,300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या श्रेणीत कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाला, सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग होण्याचा बहुमान सलग या विभागाला सलग दुसऱ्या वर्षीही मिळाला आहे,
Posted On:
15 SEP 2023 11:31AM by PIB Mumbai
कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह,यांच्या नेतृत्वाखालील निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (DoPPW) या 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या मंत्रालये/विभागांच्या श्रेणीतील प्रतिष्ठित प्रथम राजभाषा कीर्ती पुरस्कार, 2022-23 या विभागाला प्रदान करण्यात आला आहे. राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, यांच्या हस्ते विभागाचे अतिरिक्त सचिव (पेन्शन) संजीव नारायण माथूर, यांनी विभागाच्या (DoPPW) वतीने हा पुरस्कार,काल पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय राजभाषा संमेलन आणि हिंदी दिनानिमित्त आयोजित दिमाखदार समारंभात स्विकारला.
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग सचिव व्ही. श्रीनिवास, (P&PW) यांच्या अध्यक्षतेखालील निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाला,हा 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या मंत्रालये/विभागांच्या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा विभाग होण्याचा मान मिळण्याचे या विभागाचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या सर्व मंत्रालये/विभागांमध्ये प्रथम स्थानी असलेल्या विभागाला गृह मंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाच्या वतीने राजभाषा कीर्ती पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार प्रत्येक वर्षी अखिल भारतीय राजभाषा संमेलन आणि राजभाषा विभागातर्फे आयोजित हिंदी दिवस समारंभात दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे.
सहाय्यक संचालक (OL), मंजू गुप्ता,यांच्यासमवेत अवर सचिव अनिल कुमार कोईरी आणि राजेश्वर शर्मा तसेच अतिरिक्त सचिव राजेश कुमार, आणि संजीव नारायण माथूर, यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण (DoPPW) विभागाचे प्रतिनिधित्व या संमेलनात केले होते.
****
Jaydevi PS/Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957680)
Visitor Counter : 154