माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विशेष मोहीम 2.0 अंतर्गत 25.63 कोटी रुपयांचे उत्पन्न
Posted On:
14 SEP 2023 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2023
विशेष मोहीम 2.0.राबवल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि त्याच्या संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयांना मोठे यश मिळाले आहे. या मोहिमे अंतर्गत 4.73 लाख किलो भंगार/वापरून फेकून दिलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावून 25.63 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.यामुळे नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 11.43 लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अपूर्व चंद्रा यांनी मोहिमेचा सातत्याने आढावा घेतला.


* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957500)