सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
ऑगस्ट 2023 या महिन्यासाठी 2012=100 या आधार वर्षानुसार ग्रामीण, शहरी आणि संयुक्त ग्राहक किंमत निर्देशांक
Posted On:
12 SEP 2023 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ऑगस्ट 2023 या महिन्यासाठी आधार वर्ष 2012=100 नुसार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक तसेच, ग्रामीण, शहरी आणि संयुक्त भागांसाठी संबधित ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (तात्पुरती ) आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. अखिल भारतीय तसेच विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी उपगट तसेच गटांचे ग्राहक किंमत निर्देशांक देखील जाहीर केले आहेत.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1114 शहरी बाजारपेठा आणि 1181 गावांतील बाजारांना प्रत्यक्षपणे साप्ताहिक भेटी देऊन माहिती संकलित केली जाते . राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ऑगस्ट 2023 मध्ये 99.6 % ग्रामीण व 98.3 % शहरी बाजारपेठांमधून माहिती संकलित केली. तर बाजारपेठ निहाय किमती ग्रामीण बाजारपेठांसाठी 88.8% आणि शहरी बाजारपेठांसाठी 91.3% नोंदविण्यात आल्या.
सर्वसाधारण निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांकांवर आधारित अखिल भारतीय महागाई दर (विद्यमान महिन्यातील दर आणि गेल्या वर्षी याच महिन्यातील दर म्हणजे ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मधील दर ) खालीलप्रमाणे आहेत.
सर्वसाधारण निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांकांवर आधारित अखिल भारतीय महागाई दर(%) : ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मधील दर
सप्टेंबर 2023 साठी ग्राहक किंमत निर्देशांक प्रसिद्ध करण्याची पुढील तारीख 12 ऑक्टोबर 2023 (गुरुवार) आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.mospi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
Annexures
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956772)
Visitor Counter : 159