ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
डार्क पॅटर्न्सचा प्रतिबंध आणि नियमनाची मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्र सरकारने मागविल्या सार्वजनिक सूचना
Posted On:
07 SEP 2023 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2023
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने,डार्क पॅटर्न्सचा प्रतिबंध आणि नियमन मसुदा यांच्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत.या मसुद्यातील मार्गदर्शक तत्त्वे ग्राहक व्यवहार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि लिंकद्वारे ती प्रवेशयोग्य केली आहेत.
(https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/Draft%20Guidelines%20for%20Prevention%20and%20Regulation%20of%20Dark%20Patterns%202023.pdf)
यावरून सार्वजनिक टिप्पण्या/सूचना/अभिप्राय मागितले जातात आणि या विभागाला ते 30 दिवसांच्या आत (5 ऑक्टोबर 2023 पर्यंत) पाठवले जाऊ शकतात.
ई-कॉमर्स मंच, कायदेविषयक संस्था, सरकार आणि स्वयंसेवी ग्राहक संस्था (VCO's) यासह सर्व हितसंबंधीतांसोबत तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर डार्क पॅटर्नच्या प्रतिबंध आणि नियमनासाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आलेली आहेत.
ग्राहक व्यवहार विभागाने (DoCA) 13 जून 2023 रोजी "डार्क पॅटर्न" वर एक चर्चासत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये भारतीय जाहिरात मानांकन परीषद (Advertising Standards Council of India ,ASCI), विविध ई-कॉमर्स मंच ,एनएलयूज, कायदेविषयक संस्था इत्यादींनी भाग घेतला होता. डार्क पॅटर्न्स चिंतेचे कारण आहेत आणि सक्रियपणे हाताळल्या जाणे आवश्यक आहे, यावर या बैठकीत एकमत झाले होते.
या विचारविमर्शांनंतर आणि कृतीदलाने ग्राहक व्यवहार विभागाकडे सादर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यावर आधारित, डार्क पॅटर्न्स वरील प्रतिबंध आणि नियमनासाठी सध्या असलेला मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि आता तो सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी खुला ठेवला जात आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 18 (2) (l) अंतर्गत ही प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.
डार्क पॅटर्न्स वरील मसुदा मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील UI/UX (वापरकर्ता इंटरफेस/वापरकर्ता अनुभव) यांच्यातील परस्परसंवादाचा वापर करून कोणत्याही पद्धतीने किंवा भ्रामक डिझाइन पॅटर्न वापरून वापरकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी डिझाइन केलेले, अथवा काहीतरी असे जे ते करू इच्छित नाही किंवा करू शकत नाही; उपभोक्त्याचा गैरफायदा घेऊन किंवा कमजोर करून त्याची स्वायत्तता, हिरावून निर्णय घेणे किंवा निवड करणे ; दिशाभूल करणारी जाहिरात किंवा अनुचित व्यापार प्रथा किंवा ग्राहक हक्कांचे उल्लंघन करणे, हे होय.
या नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिक माहितीसाठी, पुढील लिंकवर भेट द्या:
(https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/Draft%20Guidelines%20for%20Prevention%20and%20Regulation%20of%20Dark%20Patterns%202023.pdf).
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955422)
Visitor Counter : 191