उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जन्माष्टमीच्या पूर्व संध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 06 SEP 2023 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2023 

 

जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी, मी सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

प्रेम आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या भगवान श्री कृष्णाचा जन्म दिवस आज आपण साजरा करत आहोत. त्यांची शिकवण धर्माने अधर्मावर मिळवलेल्या विजयाचा कालातीत संदेश देते. भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितलेला ज्ञानमार्ग खर्‍या अर्थाने मानवतेच्या सेवेचा आणि कल्याणाचा मार्ग प्रशस्त करतो.

भगवान श्रीकृष्णाचा ‘निष्काम कर्म’ हा  संदेश आत्मसात करून आपली जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प करूया.ही जन्माष्टमी आपल्या जीवनात शांतता, आनंद आणि सौहार्द घेऊन येवो, हीच सदिच्छा.

उपराष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955294)