संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे 'भारत ड्रोन शक्ती 2023' चे संयुक्तरित्या आयोजन
Posted On:
06 SEP 2023 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2023
ड्रोन तंत्रज्ञानामुळे क्षमता वृद्धिंगत झाली असून, जोखीम कमी होत,क्षमतांचा विकास करत नागरी आणि संरक्षण क्षेत्रात क्रांती झाली आहे. भारतात लष्करी -नागरी,या दोन्ही क्षेत्रात ड्रोनचा वापरही वाढत आहे. भारतीय हवाईदल टेहळणीसाठी दूरस्थ पध्दतीने चालवता येणाऱ्या विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. या क्षेत्रातील उदयोन्मुख स्वदेशी क्षमतेचा लाभ मेहेर बाबा स्वर्म ड्रोन स्पर्धेसारख्या उपक्रमांद्वारे घेण्याचे प्रयत्न झाले आहेत.भारतातील ड्रोन्सची डिझाईन आणि विकास क्षमतांवरील विश्वास सिध्द करणाऱ्या या स्पर्धेची पुढील फेरीची तयारी सुरू आहे.
या मानवरहित यंत्रणेचा वापर करण्याच्या आपल्या समृद्ध अनुभवाचा लाभ घेण्यासाठी, भारतीय हवाई दल, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियासोबत'भारत ड्रोन शक्ती 2023' चे सह-यजमानपद भूषवित आहे. हा उपक्रम 25 आणि 26 सप्टेंबर 2023 रोजी हिंडन (गाझियाबाद) येथील भारतीय हवाईदलाच्या तळावर आयोजित केला जाईल, जिथे भारतीय ड्रोन उद्योगाच्या वतीने हवाई प्रात्यक्षिके होतील.
सर्वेक्षण ड्रोन, कृषी ड्रोन, अग्नीशमन ड्रोन, हेवी-लिफ्ट लॉजिस्टिक्स ड्रोन, लोइटरिंग म्युनिशन यंत्रणा, काऊंटर ड्रोन,युद्धसामग्री प्रणाली, ड्रोन स्वॉर्म्स आणि काउंटर-ड्रोन अशी पन्नासहून अधिक थेट हवाई प्रात्यक्षिके 'भारत ड्रोन शक्ती 2023'या उपक्रमात सादर केली जातील, ज्यायोगे भारतीय ड्रोन उद्योगाचे सामर्थ्य पूर्ण क्षमतेने प्रदर्शित केले जाईल .यात 75 हून अधिक ड्रोन स्टार्ट-अप आणि कॉर्पोरेट्सचा सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला केंद्र सरकार, राज्य सरकारांचे विभाग, सार्वजनिक आणि खाजगी उद्योग, सशस्त्र दल, निमलष्करी दल, मित्र देशांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी आणि ड्रोन जिज्ञासू यांच्यासह सुमारे 5,000 लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'भारत ड्रोन शक्ती 2023'हा उपक्रम 2030 पर्यंत देशाला
जागतिक ड्रोन क्षेत्रातील महत्वाचे केंद्र बनण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला बळ देईल.
* * *
N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955291)
Visitor Counter : 275