राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींकडून जन्माष्टमीच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 06 SEP 2023 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे: -

“जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या माझ्या सर्व देशवासीयांना मी शुभेच्छा देते.

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त  जन्माष्टमीचा पवित्र सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशातून  शिकण्याची ही एक संधी आहे. हा सण लोकांमध्ये प्रेम आणि भक्ती  भावना वृद्धिंगत करतो.  भगवान श्रीकृष्णाने अन्यायाविरुद्ध लढून आणि धर्म तसेच न्यायाचा मार्ग अवलंबून आदर्श समाज स्थापनेचा मार्ग दाखविला आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेतील उपदेशाच्या माध्यमातून  'निष्काम कर्म'चा संदेश दिला आहे.

आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णाने दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया आणि मानवतेच्या कल्याणाच्या  भावनेने पुढे मार्गक्रमण करत आपला समाज आणि राष्ट्र बळकट करण्यासाठी योगदान देऊया”.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1955284) आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil