राष्ट्रपती कार्यालय
भारतीय कॉर्पोरेट विधि सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2023 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2023
भारतीय कॉर्पोरेट विधि सेवेतील (2021 आणि 2022 तुकडी)च्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (4, सप्टेंबर 2023) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारतीय कॉर्पोरेट विधि सेवेतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की ते कॉर्पोरेट जगताचे नियामक म्हणून काम करतात. भारतातील व्यवसाय आणि उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी देखील ते मदत करतात असे त्यांनी सांगितले. त्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यांना उद्योग आणि उद्योजकतेच्या विकासाला प्रोत्साहन आणि चालना देताना उत्तम कॉर्पोरेट प्रशासन सुनिश्चित करायचे आहे असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. त्यांच्या कृतींचा देशाच्या औद्योगिक आणि प्रशासकीय व्यवस्थेवर लक्षणीय प्रभाव पडेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, चांगले कॉर्पोरेट प्रशासन आज अतिशय प्रासंगिक आणि महत्त्वाचे आहे आणि कंपन्यांचे व्यवस्थापन भागधारक आणि इतर संबंधितांच्या हितासाठी केले जाईल हे सुनिश्चित करणे कॉर्पोरेट विधि सेवा अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल. कॉर्पोरेट संस्था नैतिक संस्कृतीचे पालन आणि भागधारकांच्या अधिकारांचा आदर करतील, हे कार्यक्षम प्रशासन मॉडेलद्वारे त्यांनी सुनिश्चित केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. देशाचा दीर्घकालीन शाश्वत विकास तसेच सर्वसमावेशक विकासासाठी प्रभावी कॉर्पोरेट प्रशासन देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की तरुण आणि हुशार नागरी सेवकांनी देशातील नागरिकांप्रति जबाबदारीच्या भावनेने काम केले पाहिजे. त्यांनी देश आणि तेथील लोकांप्रति सेवेची भावना देखील अंगिकारली पाहिजे असे त्या म्हणाल्या. देशवासीयांच्या हिताप्रति त्यांची अतूट बांधिलकी असली पाहिजे, हे त्यांनी ध्यानात ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व या तत्त्वांचे पालन केले पाहिजे असे त्या म्हणाल्या .
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1954692)
आगंतुक पटल : 187