विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित नवोन्मेषाला चालना : अॅलो ईसेलच्या पर्यावरणस्नेही प्रारंभिक बॅटरीजना तंत्रज्ञान विकास मंडळाकडून पाठबळ

Posted On: 04 SEP 2023 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मिशन लाइफ' (पर्यावरणस्नेही जीवनशैली) या दूरदर्शी उपक्रमाच्या अनुषंगाने, तंत्रज्ञान विकास मंडळाला  (टीडीबी) उत्तरप्रदेशातील लखनौ येथील  मेसर्स अॅलो इसेल प्रायव्हेट लिमिटेड सोबतच्या सहकार्याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे.

तंत्रज्ञान विकास मंडळ, 'मिशन लाईफ 'शी सुसंगत  असलेल्या नवोन्मेषी उपायांना पाठबळ  देण्याच्या आपली अतूट वचनबद्धता दर्शवताना, अॅलो इसेलच्या प्रकल्पासाठी, "पर्यावरणस्नेही-1.5V AA आकाराच्या कोरफड-आधारित बॅटरीचे व्यावसायिकीकरण" या प्रकल्पाला सहाय्य  करत आहे. 2.98 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या मुल्यांकनासह, तंत्रज्ञान विकास मंडळाचे सॉफ्ट लोन म्हणून 1.91 कोटी रुपयांचे भरीव योगदान पर्यावरणस्नेही  नवकल्पना नवीन उंचीवर नेण्याची  प्रकल्पाची क्षमता वाढवणार आहे.

स्टार्ट-अपच्या कल्पक पद्धतीमध्ये पर्यावरणस्नेही  1.5V AA आकाराची बॅटरी तयार करणे समाविष्ट असून   ही बॅटरी  जड धातू आणि विषारी रसायनांवर आधारित जुन्या पद्धतींपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. कोरफडीमधील सूक्ष्म  गुणधर्मांचा लाभ घेत, अॅलो एसेलने एक इलेक्ट्रोलाइट तयार केला आहे जो विद्यमान बाजारपेठेतील कार्यक्षमतेच्या मानकांची पूर्तता करण्यासोबतच पर्यावरणाबाबतच्या जबाबदारीचे पालन करेल.  ही कंपनी राजस्थानमधील बुंदी येथे प्रारंभिक  बॅटरीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी सुविधा निर्माण करणार आहे.

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954690) Visitor Counter : 124


Read this release in: English , Hindi , Tamil , Urdu