ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामरोजगार सेवक, संगणक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि पंचायत सहाय्यक - ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पदांसाठी www.rojgarsevak.org वेबसाइटवर रिक्त पदांची बनावट/ फसवी जाहिरात

Posted On: 01 SEP 2023 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

अलीकडेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की ग्राम रोजगार सेवक, संगणक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि पंचायत सहाय्यक या पदांसाठी www.rojgarsevak.org या वेबसाइट/लिंक वर काही बनावट रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे.रिक्त जागा  ‘मनरेगा’ च्या नावाने अपलोड केल्या जातात.

केंद्रीय मंत्रालय अशा प्रकाशित रिक्त पदांचे खंडन करते, त्याला फसवणूक म्हणतात आणि देशातील सामान्य नागरिकांना अशा फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात न अडकण्याची विनंती करते.

या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाल्यास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय जबाबदार राहणार नाही. या वेबसाइटचे स्वरूप, सामग्री आणि उपलब्धता यावर ग्रामीण विकास मंत्रालयाचे कोणतेही नियंत्रण नाही. कोणत्याही स्वरूपात कोणत्याही भागाचे किंवा संपूर्ण सामग्रीचे पुनर्वितरण किंवा पुनरुत्पादन सक्तीने प्रतिबंधित आहे.

  

S.Bedekar/G.Deoda/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954235) Visitor Counter : 216
Read this release in: English , Urdu , Hindi