शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनसीईआरटी म्हणजेच “राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा - धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा


एनसीईआरटी च्या 63 व्या स्थापना दिन सोहळ्याला धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती

Posted On: 01 SEP 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आज नवी दिल्ली येथे एनसीईआरटी च्या 63 व्या स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रधान यांनी "केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था" सीआईईटी च्या नवीन माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी ) प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयचे सचिव आर संजय कुमार; एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद सकलानी; ‘एनआयईपीए’चे कुलगुरु महेशचंद्र पंत आणि शिक्षण मंत्रालय, एनसीईआरटी , केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती आणि सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रधान यांनी एनसीईआरटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती दिली. एनसीईआरटीने संशोधन, सक्रियपणे आकार देणारे शालेय शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, आणि प्रौढ साक्षरता या क्षेत्रांत आपली जबरदस्त उपस्थिती दर्शवली आहे. एनसीईआरटी संशोधन विद्यापीठ झाल्यावर जागतिक सहकार्यासाठी आणि जागतिक शैक्षणिक मंचावर योगदानासाठी संधी देईल, असेही ते म्हणाले.

मंत्री पुढे म्हणाले की एनसीईआरटीने विकसित केलेले 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी तयार केलेले जादुई पिटाराजे खेळावर आधारित शिक्षण-शैक्षणिक साहित्य बदलाचे एक साधन म्हणून समोर येईल, ज्याचा फायदा देशातील 10 कोटी मुलांना होईल यावर त्यांनी जोर दिला. प्रधान यांनी मातृभाषेतील सामग्री विकसित करण्यावरही भर दिला.

संजय कुमार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या सूचनांनुसार शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठी एनसीईआरटीने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. एनसीईआरटी अनुवादिनीसारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीने 22 भाषांमध्ये शैक्षणिक साहित्य विकसित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमादरम्यान, भोपाळच्या प्रादेशिक शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 22 भाषांमध्ये सादर केलेल्या गाण्यासह जादूई पिटारा यावर आधारित एक संहितेचे सादरीकरण देखील केले. एनसीईआरटीच्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम आणि उपलब्धींवर प्रकाश टाकणारा एक लघुपट ही या कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आला.

 

 S.Bedekar/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954225) Visitor Counter : 166