वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

यूके-भारत 'एफटीए' वाटाघाटींच्या बाराव्या फेरीच्या फलनिष्पत्तीबाबतचे संयुक्त निवेदन


युनायटेड किंग्डम आणि भारतादरम्यान मुक्त व्यापार करारासंदर्भातील वाटाघाटींची बारावी फेरी

Posted On: 01 SEP 2023 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

भारत आणि युनायटेड किंग्डम यांच्यात 8-31 ऑगस्ट 2023 दरम्यान मुक्त व्यापार करारासंदर्भात(एफटीए) वाटाघाटींची बारावी फेरी झाली. यापूर्वीच्या फेऱ्यांप्रमाणेच ही फेरी देखील दुहेरी माध्यमांच्या मदतीने आयोजित करण्यात आली. यूकेचे अनेक अधिकारी वाटाघाटींसाठी दिल्लीमध्ये आले होते तर इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. 

24-25 ऑगस्ट 2023 रोजी भारताने जयपूर येथे जी20 व्यापार आणि गुंतवणूकविषयक मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. यूकेचे व्यापार आणि व्यवसाय सचिव केमी बाडेनोक या बैठकीसाठी भारतात आले आणि त्यांनी भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या दोघांनी मुक्त व्यापार कराराचा आढावा घेतला आणि या वाटाघाटींना प्रगतीपथावर नेण्यासाठीच्या उपायांबाबत सहमती व्यक्त केली. या वाटाघाटींची 13वी फेरी सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

 

S.Bedekar/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1954203) Visitor Counter : 98


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu