नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सचिवपदाचा वुमलुनमंग वुलनाम यांनी स्वीकारला कार्यभार
Posted On:
01 SEP 2023 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023
वुमलुनमंग वुलनाम यांनी आज भारत सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या (एमओसीए) सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. या पदावर कार्यरत राजीव बन्सल 31 ऑगस्ट 2023 रोजी सेवानिवृत्त झाले होते.
वुलनाम हे मणिपूर केडरमधील 1992 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी, वित्त मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव, आणि वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचे उप सचिव या पदांसह, केंद्रसरकारमधील अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
मणिपूर सरकारमध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त आणि परिवहन संचालक यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. जागतिक बँकेत कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1954043)
Visitor Counter : 145