वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कापूस मूल्य साखळी उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली कोईम्बतूर इथे वस्त्रोद्योग सल्लागार गटाची सातवी विचारविनिमय बैठक


“कापूस मूल्य साखळी- जागतिक समृद्धीसाठी स्थानिक नवोन्मेष ”या संकल्पनेसह भारताच्या वतीने 2 ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीत मुंबईत आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या(आयसीएसी )81 व्या पूर्ण बैठकीचे आयोजन

सीएसआयआर-एनबीआरआयच्या सहकार्याने कापसासाठी डीएनए चाचणीचा प्रकल्प सुरू करणार

Posted On: 31 AUG 2023 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 31 ऑगस्ट 2023 रोजी कोईम्बतूर येथे झालेल्या कापसासंदर्भातील वस्त्रोद्योग सल्लागार गटाच्या (टीएजी) सातव्या विचारविनिमय बैठकीत कापूस मूल्य साखळीसाठीच्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना व्ही. जरदोश, वस्त्रोद्योग सचिव रचना शाह, संबंधित मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि हितसंबंधीय या बैठकीला उपस्थित होते.संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आघाडीच्या संघटना आणि तज्ज्ञांमार्फत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

भारत आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची(आयसीएसी)81 वी पूर्ण बैठक आयोजित करत आहे आणि ती यशस्वी करण्यासाठी गोयल यांनी या बैठकीत उद्योग आणि व्यापार सदस्यांचे या अनुषंगाने लक्ष वेधले. आयसीएसीची 81 वी पूर्ण बैठक 2 ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान मुंबईत “कापूस मूल्य साखळी- जागतिक समृद्धीसाठी स्थानिक नवोन्मेष” या संकल्पनेसह आयोजित केली जाईल आणि या बैठकीला 26 सदस्य देशांतील 300 परदेशी प्रतिनिधींसह सुमारे 400 प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. कस्तुरी ब्रॅण्डच्या कापसापासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि सर्वोत्तम शाश्वत पद्धती प्रदर्शित करणे प्रस्तावित आहे.

देशात कापसाच्या डीएनए चाचणीला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस मार्कर विकसित करण्याचा प्रकल्प, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (सीएसआयआर-एनबीआरआय )यांच्या सहकार्याने सुरू केला जाईल, यावर गोयल यांनी प्रकाश टाकला.

गोयल यांनी या बैठकीत कस्तुरी कॉटन इंडियाच्या, सर्व प्रक्रियांची मागोवा घेण्याची क्षमता, प्रमाणन आणि ब्रँडिंगवरील प्रकल्पाच्या प्रगतीचेही मूल्यमापन केले आणि प्रीमियम भारतीय कापसाच्या  ब्रँडिंगमुळे संपूर्ण कापूस मूल्य साखळीत मोठी भर पडेल असे सांगत याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. या प्रकल्पाचे अंमलबजावणी भागीदार असलेल्या टेक्स्प्रोसीलने (TEXPROCIL) कस्तुरी कापसासाठी ब्रँडिंग धोरणाला अंतिम स्वरूप दिले आहे. कापसाचा भारतीय ब्रँड उदा. कस्तुरी इंडिया कॉटन याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रारंभ केला जाईल आणि भारतीय कापसापासून तयार केलीली वस्त्र उत्पादने जागतिक नकाशावर आणण्यासाठी हे सहाय्य्यकारी ठरेल.

कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रकल्पाच्या प्रगतीचीही मंत्र्यांनी नोंद घेतली आणि देशांतर्गत उद्योगाला चालना देण्यासाठी भारतीय कापसाची उत्पादकता वाढवणे ही काळाची गरज आहे यावर भर दिला. उद्योग आणि वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील हितसंबंधितांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विचारविनिमयाच्या माध्यमातून मंत्र्यांनी दाखवलेल्या तत्पर आणि व्यावहारिक दृष्टिकोनाबद्दल त्यांचे प्रामाणिकपणे आभार व्यक्त केले.

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1953883) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu