वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन संलग्न अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास केंद्र सरकारने दिली मुदतवाढ
कृत्रिम धाग्यांचे पोशाख, कृत्रिम धाग्यापासून तयार केलेली वस्त्रप्रावरणे आणि तंत्रज्ञान वस्त्रांची उत्पादने यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत नव्याने अर्ज मागवले
Posted On:
31 AUG 2023 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2023
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने कृत्रिम धाग्यांचे पोशाख, कृत्रिम धाग्यांपासून तयार केलेली वस्त्रप्रावरणे = आणि तंत्रज्ञान वस्त्रोद्योग उत्पादने यातील उद्योगांना वस्त्रोद्योगासाठी असलेल्या प्रोत्साहन संलग्न अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यास अजून दोन महिने म्हणजेच 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या उद्योगांशी संबंधितांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी मंत्रालयाने या योजनेत स्वारस्य असलेल्या उद्योगांसाठी नव्याने अर्ज मागवण्यास प्रोत्साहन संलग्न अनुदानासाठीचे पोर्टल 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेतला होता.
* * *
R.Aghor/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953875)
Visitor Counter : 111