विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
ई कॉमर्स मंच स्टार्ट अप्स किंवा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारे महत्त्वाचे साधन : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे प्रतिपादन
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून कृषी तंत्रज्ञान ते जैवतंत्रज्ञान, समुद्र विज्ञान ते अंतराळविज्ञान अशा विविध क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांसाठी योग्य अशी वातावरण निर्मिती
Posted On:
31 AUG 2023 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2023
ई-कॉमर्स मंच हे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठीचे सक्षम माध्यम असल्याचे प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंग यांनी आज केले.
नवी दिल्ली येथे 'नवोन्मेषाची जोपासना आणि नवोद्योजकता : छोट्या उद्योगांच्या यशासाठी मार्ग निर्माण' ही संकल्पना असलेल्या चौथ्या ॲमेझॉन संभव परिषदेला संबोधित करताना आज जितेंद्र सिंग यांनी सांगितले की सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योग हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत. कारण याच क्षेत्रातून उद्योगांसाठी महत्त्वाच्या अशा पूरक घटकांचा पुरवठा होतो आणि त्यामुळेच देशातील संपूर्ण औद्योगिक विकासात हे उद्योग महत्त्वाचा वाटा उचलतात. हे उद्योग विक्रीयोग्य वस्तू घडवतात, मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन घेतात, आणि त्यांच्यावर प्रक्रिया करतात. ही सर्व आपल्याला विशेषतः सर्वात महत्त्वाचे भागधारक आणि लाभार्थी असलेल्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना व्यवसाय सुलभतेच्या दिशेने घेऊन जाणारी पावले आहेत, असे मंत्री महोदयांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा वेगाने विकास पावत असलेल्या संशोधनाधारित अर्थव्यवस्थांमधील एक अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. ई-कॉमर्स मंचांबरोबरचा समन्वय हा खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील, सरकार आणि उद्योग यांच्यामधील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सक्षम संसाधने आणि सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग यांच्याधील सेतू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्यामध्ये भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याची तसेच आपले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न विकसित करण्याची ताकद आहे.
संशोधनाच्या आणि नवऊद्योजकतेच्या मैदानावर दृढ पाय रोवून उभे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताला अर्थव्यवस्थांच्या पंक्तीत नेऊन बसवण्यासाठी सक्षम असणारे उद्योग यामुळे भारतातील तरुणांसाठी सध्याचा काळ सर्वोत्तम आहे, असेही जितेंद्र सिंग यांनी नमूद केले.
* * *
R.Aghor/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953832)
Visitor Counter : 98