सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) सकल देशांतर्गत उत्पादन 7.8 टक्के


Posted On: 31 AUG 2023 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्ट 2023 

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या,  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, स्थिर (2011-12) आणि सध्याच्या दोन्ही किंमतीवर आधारित आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज जाहीर केला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पहिल्या तिमाहीतील  प्रत्यक्ष जीडीपी किंवा स्थिर (2011-12)  किंमतींवर आधारित जीडीपी, 2022-23 च्या पहिल्या तिमाहीच्या 37.44 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 40.37 लाख कोटींची पातळी गाठण्याचा अंदाज आहे. यात  2022-23 मधील पहिल्या तिमाहीतील 13.1 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 7.8 टक्के वाढ दर्शवते.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पहिल्या तिमाहीत सध्याच्या किंमतींवर नॉमिनल जीडीपी जीडीपी अंदाजे ₹ 70.67 लाख कोटी आहे, जो आर्थिक वर्ष 2022-23 मधील पहिल्या तिमाहीत ₹ 65.42 लाख कोटी होता. हे 2022-23 मधील पहिल्या तिमाहीतील  27.7 टक्क्यांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत 8.0 टक्के वाढ दर्शवते.

जीडीपी संकलनासाठी वापरल्या जाणार्‍या एकूण कर महसुलात जीएसटी नसलेला महसूल तसेच जीएसटी महसूल यांचा समावेश होतो. उत्पादनांवरील कर आणि सध्याच्या किमतींवरील उत्पादनांवरील अनुदानाचा अंदाज घेण्यासाठी महालेखा नियंत्रक (सीजीए) आणि भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (सीएजी) यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध ताज्या माहितीचा वापर करण्यात आला आहे. स्थिर किंमतींवर आधारित उत्पादनांवर कर प्राप्त करण्यासाठी, कर आकारलेल्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीच्या प्रत्यक्ष प्रमाणात वाढीचा वापर करून विक्रीच्या प्रत्यक्ष प्रमाणात एक्स्ट्रापोलेशन केले जाते आणि करांचे एकूण आकारमान मिळवण्यासाठी ते एकत्रित केले जाते.

जुलै-सप्टेंबर, 2023 (दुसरी तिमाही  2023-24) या तिमाहीसाठी तिमाही जीडीपीचे पुढील अंदाज 30.11.2023 रोजी प्रसिद्ध केले जातील.

Click here to see in PDF format

 

 

 

 

Annexure

  

*Total Telephone Subscribers Data is upto 31st May, 2023.

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953815) Visitor Counter : 168


Read this release in: Hindi , English , Urdu