राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती ‘सकारात्मक परिवर्तनाचे वर्ष‘ या ब्रम्हकुमारी परिवाराच्या राज्यस्तरावरील कार्यक्रमाच्या उद्घाटनाला रायपूर येथे उपस्थित
Posted On:
31 AUG 2023 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज, 31 ऑगस्ट 2023 रोजी रायपूर येथे ब्रम्हकुमारी परिवारातर्फे राज्यपातळीवरील ‘सकारात्मक परिवर्तनाचे वर्ष' या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्या.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की सध्या आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. पण काही काळ तरी इलेक्ट्रॉनिक साधनांपासून दूर रहाणे आवश्यक आहे. आपल्या शारिरीक तसेच मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. सर्वांना अंतर्गत मजबूत राहण्याचा तसेच सकारात्मक कामात मग्न व सकारात्मक विचारांच्या आणि व्यक्तींच्या सान्निध्यात रहाण्याचा आग्रह त्यांनी केला. ज्या व्यक्तीं योग्य मार्ग स्वीकाराची प्रेरणा देतील अशा व्यक्तींच्या सान्निध्यात रहायचा सल्लाही त्यांनी दिला.
एका बाजूला आपला देश प्रत्येक दिवशी नवनवीन शिखरे गाठत आहे मग ते चांद्रयान असो किंवा जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात नवीन अध्याय लिहिणे असो आपण अनेक विक्रम करत आहोत, दुसरीकडे अत्यंत गंभीर अशा घटनाही घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच (नीट)NEET साठी तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा अंत करून घेतला. स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास करत असणाऱ्या अनेक मुलांनी याआधीही अशा तऱ्हेने आपले जीवन संपवले आहे असे नमूद करत राष्ट्रपती म्हणाल्या की स्पर्धा ही जीवनाला वरच्या स्तरावर नेणारी सकारात्मक बाब आहे. जय आणि पराजय हे दोन्ही जीवनाचेच भाग आहेत.
क्षणिक अपयश हे भविष्यातील मोठ्या यशाचा मार्ग आखते, हे दाखवून देणारी अनेक उदाहरणे आहेत. कुटुंबीय मित्र-मैत्रिणी शिक्षक आणि समाजाने या मुलांची मानसिकता समजून घेणे त्यांना मदत करायला हवी असे त्या म्हणाल्या. अभ्यासाचा ताण आणि स्पर्धा यांना ही मुले तोंड देत असताना सर्व संबंधितांनी सकारात्मक विचारसरणीघ्या माध्यमातून ताण दूर केला पाहिजे आणि या मुलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदतीचा हात दिला पाहिजे, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य असते. दुसऱ्यांकडून प्रेरणा घेणे हे चांगलेच आहे परंतु स्वतःच्या आवडी क्षमता यांचा विचार करून योग्य मार्ग निवडायला हवा.. यासाठी स्वतःशी संवाद असणे आवश्यक आहे. आपल्यामधील स्वत्व जागे करून आपण आपल्या क्षमताचा विकास घडवून आणला पाहिजे सकारात्मक विचार आणि कृतींमुळे आपले स्वतःचे नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचे जीवन सुद्धा सुधारते, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
जगभरात प्रेम सुसंवाद आणि शांती नांदावी यासाठी ब्रह्मकुमारी संस्था काम करत आहे यावर राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. एखाद्याचे विचार बदलणे सोपे नसते पण हे चिकाटीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य झाले असे राष्ट्रपतीनी सांगितले.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
R.Aghor/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1953789)