अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या उत्तर विभागातील प्रादेशिक ग्रामीण बँकांची आढावा बैठक


1 नोव्हेंबर 2023 पर्यंत आरआरबीची डिजिटल क्षमता अद्ययावत करण्यावर अर्थमंत्र्यांनी दिला भर

Posted On: 30 AUG 2023 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे देशाच्या उत्तर विभागातील प्रादेशिक ग्रामीण बँकांची (आरआरबी) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

आढावा बैठकीदरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या डिजिटल क्षमता अद्ययावत आणि सुधारित करण्यावर भर दिला. पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेशी संलग्न असलेल्या सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत डिजिटल ऑनबोर्डिंग साठी सक्षम होतील, हे सुनिश्चित करावे, असे निर्देशही अर्थमंत्र्यांनी दिले.

पुनरावृत्ती झालेली प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) खाती रद्द टाकावीत, आणि सफरचंद उत्पादकांसाठी, विशेषतः जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश इथल्या सफरचंद उत्पादकांसाठी साठवण सुविधा उपलब्ध करावी, अशा सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व प्रादेशिक ग्रामीण बँकांना केल्या.

बँकांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) समूहांमधील (क्लस्टर) आरआरबीची नोंद करावी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने निवडलेल्या क्लस्टर मधील ग्रामीण शाखांचे नेटवर्क वाढवण्यावर अधिक भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि आर्थिक समावेशकतेची व्याप्ती आणखी वाढवण्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला. या योजनांशी संबंधित पूर्वनियोजित उपक्रम कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यासाठी पथदर्शक आराखडा तयार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

वित्तीय सेवा विभागाचे सचिव आणि अतिरिक्त सचिव, इतर वरिष्ठ अधिकारी, भारतीय रिझर्व बँक, संबंधित राज्य सरकारे, नाबार्ड, प्रायोजक बँका आणि आरआरबीचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

 

* * *

R.Aghor/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953602) Visitor Counter : 99