पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

BS 6 स्टेज II ‘इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स इंधन वाहन’ च्या जगातील पहिल्या प्रोटोटाइपचे आज करण्यात आले अनावरण


हे अभिनव वाहन भारताच्या कठोर उत्सर्जन मानकांचे पालन करण्यासाठी तयार केले आहे – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

फ्लेक्स इंधन वाहनांना प्रोत्साहन देऊन भारत इथेनॉलच्या अतिरिक्त क्षमतेचा वापर करू शकतो – पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी

Posted On: 29 AUG 2023 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2023

 

ऊर्जा आणि वाहन निर्मिती  उद्योगातील फ्लेक्स इंधन वाहन तंत्रज्ञानाची क्षमता अधोरेखित करत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, या वाहन तंत्रज्ञानामुळे इथेनॉल हा पेट्रोलला मोठा पर्याय वापरण्याची  संधी मिळते, कारण यात इथेनॉलचे  20% पेक्षा जास्त उच्च मिश्रण वापरता येऊ शकते.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने विकसित केलेल्या जगातील पहिल्या BS-6 स्टेज-II इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स इंधन वाहनाच्या प्रोटोटाइपच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री बोलत होते. याबद्दल सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की टोयोटाचा हा उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे कारण तो जगातील पहिला BS 6 (स्टेज II) इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स फ्युएल वाहन प्रोटोटाइप सादर करत आहे , ज्यामध्ये फ्लेक्स इंधन इंजिन तसेच इलेक्ट्रिक पॉवरट्रेन हे दोन्ही आहेत, ज्यामुळे उत्तम इंधन कार्यक्षमतेसह इथेनॉल मिश्रणाचा अधिक वापर करण्याची सुविधा   मिळते. “उद्योग आणि सरकारच्या सहकार्याने, आपण भारताला स्वच्छ तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनताना आणि लवकरच ऊर्जेमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करताना पाहत आहोत” असे ते पुढे म्हणाले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी बीएस 6 स्टेज II 'इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स फ्युएल व्हेईकल' या जगातील पहिल्या प्रोटोटाइपच्या अनावरण  प्रसंगी आपले विचार मांडताना सांगितले की हे नाविन्यपूर्ण वाहन आहे जे  इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असून भारताच्या कठोर उत्सर्जन मानकांचे पालन करण्यासाठी तयार केले आहे. आणि  ते जागतिक स्तरावर पहिले BS 6 (टप्पा II) इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स फ्युएल व्हेईकल प्रोटोटाइप ठरले आहे. त्यांनी नमूद केले की या प्रोटोटाइपच्या आगामी टप्प्यांमध्ये सूक्ष्म शोध, अधिकृत मंजुरी आणि प्रमाणीकरण प्रक्रियांचा समावेश आहे.

हरदीप सिंग पुरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतात E20 मिश्रणातून अधिक इथेनॉलची क्षमता आहे. फ्लेक्स फ्युएल व्हेईकल (FFVs) आणि फ्लेक्स फ्युएल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (FFV-SHEV)/इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देऊन  या अतिरिक्त क्षमतेचा देशात उपयोग केला जाऊ शकतो.

इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स इंधन वाहनामध्ये फ्लेक्सी इंधन इंजिन आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन दोन्ही असतात. मजबूत  हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनाप्रमाणेच उच्च इथेनॉल वापर आणि जास्त इंधन कार्यक्षमतेचा दुहेरी लाभ देण्याची यात  क्षमता असून 30-50% अधिक इंधन कार्यक्षमता प्रदान करू शकते कारण ते इंजिन बंद करून इलेक्ट्रिक वाहन  मोड 40-60% चालवू शकते.

हरदीप सिंग पुरी यांनी 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी आणि हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक लढ्याचे नेतृत्व करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख केला.सरकार आणि उद्योगांनी केलेल्या प्रचंड प्रयत्नांमुळे, 8 वर्षांच्या अल्पावधीत  भारतात इथेनॉल मिश्रण 8 पटीने अधिक वाढले आहे. सर्व हितधारकांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत पुरी म्हणाले की, आपण  2030 चे   E20 मिश्रणाचे मूळ उद्दिष्ट  2025 पर्यंत (आधीच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा 5 वर्षे अगोदर) साध्य करण्याचे ठरवले  आहे.  सर्व हितधारकांनी केलेल्या जोरदार प्रयत्नांमुळे आपण हे लक्ष्य साध्य करू असे त्यांनी नमूद केले.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953393) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil