प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचा समारोप, घोषणापत्र दस्तावेज आणि अध्यक्षीय सारांश केला जारी

Posted On: 28 AUG 2023 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्ट 2023

 

भारताच्या जी20 अध्यक्षतेखाली शेर्पा ट्रॅक अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जी20  मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या (जी20-सीएसएआर) दुसऱ्या गोलमेज परिषदेचा आज गुजरातमधील गांधीनगर येथे यशस्वी समारोप झाला. सर्व जी20 सदस्य देश तसेच निमंत्रित राष्ट्रे यांच्यातर्फे घोषणापत्र दस्तावेज आणि अध्यक्षीय सारांश जारी करण्याबाबत परस्पर सहमतीसह ही परिषद संपन्न झाली.

जी20-सीएसएआर म्हणजे पुराव्यांवर आधारित धोरण आखणी  तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक सल्ला व्यवस्था अधिक बळकट करणे शक्य होण्याच्या दिशेने समावेशक तसेच कृती-आधारित पद्धतीने जागतिक वैज्ञानिक सल्ला यंत्रणेमध्ये समन्वय साधण्याच्या दिशेने केलेला प्रयत्न आहे.

परिषदेच्या कामकाजादरम्यान आज दिवसभरात पुढील महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत चर्चा करण्यात आली. (अ)अधिक चांगले रोग प्रतिबंधन, नियंत्रण आणि महामारीविषयक सज्जतेसाठी एक आरोग्य संकल्पनेतील संधींचा वापर करणे; (ब) अभ्यासपूर्ण वैज्ञानिक माहिती मिळवता यावी यासाठी जागतिक पातळीवरील प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे; (क)विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्थेत निःपक्षता, वैविध्य, समावेशन तसेच सुलभरीत्या पोहोच यांची आणि नव्याने उदयाला येणाऱ्या ज्ञात, अज्ञात प्राधान्यक्रमांची सुनिश्चिती आणि (ड) समावेशक, सातत्यपूर्ण आणि कृती-आधारित जागतिक वैज्ञानिक सल्लागार यंत्रणा निर्माण करणे.

जी20-सीएसएआर बैठकीमध्ये जी20 सदस्य देशांचे आणि निमंत्रित देशांचे प्रतिनिधी तसेच जागतिक आरोग्य संघटना आणि युनेस्को या दोन आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी अशा सर्वांचाच सक्रीय सहभाग पाहायला मिळाला. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) अजय कुमार सूद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शाश्वत यंत्रणा म्हणून जी20-सीएसएआर उपक्रमाला आकार देण्यासाठीच्या विविध मार्गांवर चर्चा करण्यासाठी जी20 देश आणि निमंत्रित राष्ट्रे यांनी जोपासलेल्या वचनबद्धतेची सूद यांनी प्रशंसा केली.

जी20-सीएसएआर बैठकीला संबोधित करताना प्रा.सूद म्हणाले, “सामुहिकपणे प्रत्येकाला निःपक्षपातीपणे लाभ मिळवून देणाऱ्या आणि आमची सामायिक दूरदृष्टी प्रतिबिंबित करणाऱ्या समावेशक आणि सशक्त जागतिक वैज्ञानिक सल्लागार यंत्रणा निर्माण करण्यासाठीच्या मुख्य तत्वांवर हा उपक्रम आधारित आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय भागधारकांकडून मिळत असलेला भरघोस पाठींबा अत्यंत उत्साहवर्धक आहे.”

‘अधिक चांगले रोग प्रतिबंधन, नियंत्रण आणि महामारीविषयक सज्जतेसाठी एक आरोग्य संकल्पनेतील संधींचा वापर’ या संकल्पनेअंतर्गत, जी20 देशांनी एक आरोग्य दृष्टीकोनाच्या माध्यामातून मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरण यांच्या आरोग्याला असलेल्या परस्परावलंबी जोखमींचा सामना करण्याचे महत्त्व अधोरेखित  केले आहे.

‘अभ्यासपूर्ण वैज्ञानिक माहिती मिळवता यावी यासाठी जागतिक पातळीवरील प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे’ या संकल्पनेअंतर्गत, जी20 देशांच्या परिघातील तसेच परीघाबाहेरील समुदायांना योग्य सरकारी अर्थसहाय्यासह तातडीने आणि सार्वत्रिकरित्या अभ्यासपूर्ण वैज्ञानिक माहिती सहज मिळवून देण्याच्या गरजेबाबत जी 20 देशांनी विचारविनिमय केला.

जी20-सीएसएआर उपक्रम पुढे सुरु ठेवण्यासाठी याचा बॅटन ब्राझीलकडे सोपवण्यात आला.

Outcome Document and Chair’s Summary: https://www.g20.org/content/dam/

Post-Event Press Conference: https://youtube.com/live/x0DJJ53iuHs?feature=share

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1953072) Visitor Counter : 86