पंतप्रधान कार्यालय
जनधन योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त पंतप्रधानांनी योजनेच्या लाभार्थ्यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2023 9:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज जनधन योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या योजनेच्या लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.
MyGov च्या थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“पीएम जनधन योजनेची नऊ वर्षे होत असताना मी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी ज्यांनी काम केले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. आपल्या लोकांना सक्षम बनवण्याच्या कामातील हा महत्वाचा टप्पा आहे. विकसित होत असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक भारतीयाला योग्य स्थान देण्याची हमी देत, या उपक्रमाद्वारे आम्ही लाखो नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. #9YearsofJanDhan"
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1953061)
आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam