कृषी मंत्रालय
कृषी आणि कृषक कल्याण विभागाद्वारे भरड धान्य - आधारित पाककृतींवर लक्ष केंद्रित करून, विविध निमलष्करी आणि इतर सरकारी कॅन्टीनमध्ये सेवा देणाऱ्या 200 हून अधिक शेफ/कुक यांच्यासाठीच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
26 AUG 2023 2:24PM by PIB Mumbai
कृषी आणि कृषक कल्याण विभागाद्वारे भरड धान्य - आधारित पाककृतींवर लक्ष केंद्रित करून, विविध निमलष्करी आणि इतर सरकारी कॅन्टीनमध्ये सेवा देणाऱ्या 200 हून अधिक शेफ/कुक यांच्यासाठीच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी शेफना त्यांच्या संबंधित पाककृतीत साध्या पण पौष्टिक भरडधान्य -आधारित पदार्थांचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि जास्तीत जास्त लोकांना भरड धान्याच्या वापरास प्रोत्साहन देणे हा, आजपासून सुरू होणार्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम सहभागींना साध्या न्याहारी पासून ते पौष्टिक जेवणापर्यंतच्या विविध भरडधान्य - आधारित पाककृतींबद्दल परिचित करेल आणि त्यांना, ते काम करत असलेल्या संबंधित कॅन्टीनमध्ये समाविष्ट करण्यास प्रोत्साहित करेल.
अतिरिक्त सचिव फैज अहमद किडवाई, अतिरिक्त सचिव मनिंदर कौर द्विवेदी, आणि कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या सहसचिव (पीक) शुभा ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी सहभागींना त्यांच्या दैनंदिन आहारात भरडधान्यांचा समावेश करण्यास आणि ग्राहक, शेतकरी आणि हवामानाच्या हितासाठी देशाच्या ‘भरडधान्य चळवळी’मध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले.
आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), इंडो-तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, सशस्त्र सीमा बल आणि विविध सरकारी कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या निमलष्करी दलातील 200 हून अधिक शेफ आणि कुक साठी पाककला प्रशिक्षण सत्राचे आयोजन, कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या कृषी आणि कृषक कल्याण विभागाद्वारे पुसा येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम) मध्ये करण्यात आले आहे.
आयएचएम चे प्राचार्य के. के. पंत यांनी सभागृहात मान्यवरांचे आणि सहभागींचे स्वागत केले आणि निमलष्करी दलांची सर्वांगीण पोषणविषयक गरज पूर्ण करण्यात भरड धान्यांच्या भूमिकेवर भर दिला. दरदिवशी 100 हून अधिक सहभागींना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने (एमएचए) सर्व दलांच्या जवानांच्या भोजनात भरडधान्य (श्रीअन्न) समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर, प्रशिक्षण सत्रामुळे भारताच्या एकंदरीत 'भरडधान्य चळवळीला' आणखी बळ मिळेल. निमलष्करी कर्मचार्यांसाठी ऊर्जेचा परिपूर्ण अन्न पर्याय म्हणून जेवणात 30% भरडधान्य समाविष्ट करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला होता आणि त्यांच्या शारीरिकदृष्ट्या खडतर दिनचर्येला मदत केली होती. भरडधान्यांना एकत्रितपणे तंतुमय पदार्थ, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि मानवी आरोग्यासाठी महत्वाच्या इतर आवश्यक पोषक घटकांनी युक्त 'सुपरफूड' अर्थात ‘पूर्णान्न’ मानले जाते. निमलष्करी दलातील शेफ/कुकचा सहभाग हे सुनिश्चित करेल की भरडधान्य त्यांच्या आहाराचा एक नियमित, सकस आणि स्वादिष्ट घटक बनतील.
सहभागींनी बाजरी बिसी बेले भात, फॉक्सटेल मिलेट पुरी, प्रोसो मिलेट कोफ्ता करी, ब्राऊन टॉप मिलेट पुलाव आणि नाचणी हलव्यासह अनेक आकर्षक पाककृती शिकून घेतल्या. प्रशिक्षणात शेतकरी उत्पादक संघटना देखील सहभागी होत आहेत, ज्यांनी त्यांच्या विविध भरडधान्य -आधारित रेडी-टू-कुक आणि रेडी-टू-इट पदार्थांचे नमुने प्रदर्शित केले. हे प्रदर्शन उपस्थितांना स्वयंपाकघरातील घटक म्हणून भरडधान्यांच्या वैविध्याविषयी आणि त्यांच्या स्वयंपाकातील वापराविषयी माहिती देईल.
***
M.Pange/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952558)
Visitor Counter : 112