विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
“एक सप्ताह एक प्रयोगशाळा” अभियानाअंतर्गत सीएसआयआर – सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इंस्टिट्यूट (सीजीसीआरआय) यांनी आयोजित केला विद्यार्थी-वैज्ञानिक संपर्क कार्यक्रम
Posted On:
26 AUG 2023 10:35AM by PIB Mumbai
‘एक सप्ताह, एक प्रयोगशाळा’ या अभियानाअंतर्गत, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- सीएसआरआर आणि सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक संशोधन संस्था (सीजीसीआरआय) यांनी कोलकाता येथे 25 ऑगस्ट 2023 रोजी, विद्यार्थी- वैज्ञानिक संपर्क अभियानाचे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक वृत्तीची जोपासना करणे आणि विविध वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
CSIR-CGCRI चे संचालक. डॉ.एस.के. मिश्रा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे आणि सीएसआयआर-सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. के. जे. श्रीराम यांनी आपल्या भाषणात राष्ट्र उभारणीत सीएसआयआरच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, तसेच सन्माननीय अतिथी, सीएसआयआर- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजीचे संचालक डॉ. अरुण बंदोपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रहितासाठी विज्ञानाची कास धरण्याची प्रेरणा दिली.
या कार्यक्रमात सात शाळांमधील सुमारे 295 विद्यार्थी आणि 28 शिक्षक सहभागी झाले होते. सहभागी शाळांमध्ये डमडमचे केंद्रीय विद्यालय, सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट, लक्ष्मीपत सिंघानिया स्कूल, सिल्व्हर पॉइंट स्कूल, मुकुल बोस मेमोरियल स्कूल, जाधवपूर हायस्कूल आणि द समिट स्कूल यांचा समावेश होता. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी व्याख्याने, थेट संवाद सत्रे, CSIR-CGCRI च्या विविध उत्पादनांची प्रात्यक्षिके, वैज्ञानिक प्रश्नमंजुषा, व्हर्च्युअल लॅब प्लॅटफॉर्म अशा विविध वैज्ञानिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी CGCRI मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952457)
Visitor Counter : 111