संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरता या विषयवार विशाखापट्टणम येथे परिषद आणि परिसंवादाचे आयोजन

Posted On: 26 AUG 2023 11:31AM by PIB Mumbai

 

आयएनएस कलिंगाने 23 ऑगस्ट 2023 रोजी विशाखापट्टणमच्या नौदल तळावर असलेल्या समुद्रिका सभागृहात 'क्षेपणास्त्र दुरुस्तीबाबत आत्मनिर्भरता आणि तंत्रज्ञानाचे देशीकरण (अमृत-2023)' या विषयावर परिषद आणि चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन व्हॉईस ॲडमिरल समीर सक्सेना, एव्हीएसएम, एन एम, प्रमुख, पूर्व नौदल कमांड यांनी केले. उद्घाटन सत्रात डॉ. वाय श्रीनिवास राव, डी एस, डी जी एन एस आणि एम तसेच जी ए श्रीनिवास मूर्ती, डी एस, संचालक - डी आर डी एल, यांची भाषणे झाली. विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी आपापल्या संकल्पनांवर आधारित प्रबंध सादर केले, ज्यातून विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण झाली. पुण्यातील लष्करी तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय संशोधन आणि विकास महामंडळ (NRDC), यांनीही शैक्षणिक भागीदार म्हणून या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला, आणि आपल्या कामाविषयी महत्वाची माहिती दिली.

ह्या परिसंवादाला डीआरडीओ, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी संरक्षण कंपन्या, भारतीय खाजगी संरक्षण उद्योग, एमएसएमई/स्टार्ट-अप, राज्य सरकार आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (SIDM) चे प्रतिनिधी, अशा सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमादरम्यान प्रदर्शन स्टॉल्स देखील लावण्यात आले होते, ज्यामध्ये डीआरडीओ प्रयोगशाळा, सरकारी आणि खाजगी संरक्षण कंपन्यांनी क्षेपणास्त्र दुरुस्ती आणि स्वदेशीकरणातील आपले कौशल्य आणि क्षमता प्रदर्शित केल्या.

या परिसंवाद-चर्चासत्रातून या क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक आणि खाजगी उद्योग, डीआरडीओ प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था आणि भारतीय नौदल अशा  सर्वांसाठी, केंद्र  सरकारच्या - आत्मनिर्भर भारतअभियानाच्या पूर्ततेसाठी लाभदायक असे सहकार्याचे कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. भारतीय सैन्यदलांना, विशेषतः नौदलाला परदेशी शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आपल्या संरक्षण उद्योगाची क्षमता अधिक बळकट करण्यासाठी, पर्यायाने देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी या वातावरणाचा लाभ होऊ शकेल.

कार्यक्रमाला उपस्थित  प्रमुख पाहुण्यांनी आत्मनिर्भर भारतच्या प्रवासात तसेच  अमृत (AMRIT-23) अभियान  यशस्वी करण्यासाठी आलेल्या सर्व सहभागी संस्थांचे अभिनंदन केले.  सी एस नायर, कमांडिंग ऑफिसर, आयएनएस कलिंग यांनी आभार मानले. प्रदर्शन स्टॉल्सना नौदल कर्मचारी, विषय तज्ञ, स्थानिक कंपन्या, तांत्रिक संस्था आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भेट दिली. आयएनएस कलिंगचे मुख्य अधिकारी कमोडोर सीएस नायर यांनी उपस्थितांचे आभार मानले. नौदल अधिकारी, कर्मचारी आणि तज्ञांनी यावेळी आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952456) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu