गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसमधील प्रतिष्ठित 'द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर'ने सन्मानित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले अभिनंदन
पंतप्रधानांना इतर देशांकडून मिळणारा प्रत्येक पुरस्कार देशातील प्रत्येक नागरिकासाठी सन्मान, असे पुरस्कार देशाचा अभिमान वाढवणारे - अमित शहा
Posted On:
25 AUG 2023 6:01PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसमध्ये प्रतिष्ठित 'द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर'ने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, “समाजांना जोडणे, हृदय जोडणे आणि राष्ट्रांना त्यांच्या अभिनव पद्धतीने एकत्र करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशांतून एकापाठोपाठ एक सन्मान मिळाले आहेत. पंतप्रधानांना कोणत्याही देशाकडून मिळणारा पुरस्कार हा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे. या पुरस्कारांमुळे देशाचा गौरव वाढतो. ग्रीसमधील प्रतिष्ठित 'द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' ने सन्मानित झाल्याबद्दल मोदीजींचे मनःपूर्वक अभिनंदन.’’
https://x.com/amitshah/status/1695039441751126276?s=48&t=TYQpZk9GYbxE_Un686FYnA
***
S.Bedekar/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1952239)
Visitor Counter : 166