सांस्कृतिक मंत्रालय
वाराणसी येथे भारताच्या अध्यक्षतेखाली G20 सांस्कृतिक कार्यगटाच्या चौथ्या बैठकीत घोषणा पत्राच्या मसुद्यावरील चर्चा आजपासून सुरु
Posted On:
24 AUG 2023 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2023
वाराणसी येथे आज भारताच्या अध्यक्षतेखाली चौथ्या G20 सांस्कृतिक कार्यगटाच्या (सीडब्ल्यूजी) बैठकीत घोषणा पत्राच्या मसुद्यावर चर्चा सुरू झाली. G20 सदस्य, आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आणि G20 सांस्कृतिक कार्यगटाचे अध्यक्ष गोविंद मोहन यांनी स्वागतपर भाषण केले.
G20 सीडब्ल्यूजीच्या अध्यक्षांनी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी अवतरण (लँडिंग) करून, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञांनी केलेल्या असामान्य कामगिरीची प्रशंसा केली आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित केला. भारताच्या यशस्वी चांद्र मोहिमे बद्दल G20 सदस्यांनी भारताचे अभिनंदन केले.
सांस्कृतिक कार्य गटाच्या पहिल्या दोन बैठकींमधून, सदस्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यामध्ये सीडब्ल्यूजीला यश मिळाले असून, संकल्पनांवर आधारित जागतिक वेबिनारचा हा सकारात्मक परिणाम आहे. हम्पी येथे झालेली तिसरी सांस्कृतिक कार्यगटाची बैठक महत्वाची ठरली, ज्यामध्ये सीडब्ल्यूजीच्या कार्यपद्धतीचा आराखडा ठरला आणि सामूहिक कृती आणि कामकाजाचा मसुदा ठरवण्याची वचनबद्धता मजबूत केली.
उद्घाटन सत्रानंतर, सर्व प्रतिनिधी 26 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीसाठी घोषणा पत्राच्या मसुद्यावरील चर्चेत सहभागी झाले आणि कामकाजाच्या सत्रांना सुरुवात झाली. भारत G20 नेत्यांच्या परिषदेत एकमताने सहमत होणारा ठराव स्वीकारण्याची आकांक्षा बाळगतो, जो संस्कृतीला धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी स्थान देतो, तसेच व्यापार, पर्यटन आणि डिजिटल यासारख्या इतर प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांमध्ये समन्वय साधतो.
दिवसभराच्या चर्चेनंतर, प्रतिनिधींनी वाराणसी येथील गंगा आणि वरुण या नद्यांच्या संगमाजवळील सारनाथला भेट दिली.
G20 सदस्य, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर ही बैठक उद्या पुढे सुरू राहणार असून, यावेळी 26 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीसाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या घोषणेच्या मसुद्यावर चर्चा होईल.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1951844)
Visitor Counter : 90