संरक्षण मंत्रालय

सशस्त्र दलांची परिचालन क्षमता वाढवण्यासाठी 7,800 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना डीएसीची मंजुरी

Posted On: 24 AUG 2023 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 24 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत सुमारे  7,800 कोटी रुपयांच्या भांडवल अधिग्रहण प्रस्तावांना आवश्यकता स्वीकृती   (एओएन)  देण्यात आली. भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, डीएसीने खरेदी  (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत Mi-17 V5 हेलिकॉप्टरसाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) संच खरेदी करायला आणि बसवायला एओएन ची  मंजुरी दिली यामुळे ही हेलिकॉप्टर्स अधिक काळ सेवेत राहण्यासाठी सक्षम होतील. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) संच  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून खरेदी केले जातील.

डीएसी ने चिलखती तुकडीसाठी   जमिनीवरील स्वयंचलित प्रणाली खरेदी करण्याच्या एओएन ला देखील मंजुरी दिली आहे. मानवरहित पाळत ठेवणे, दारुगोळा, इंधन आणि इतर सामानाची लॉजिस्टिक पूर्तता आणि युद्धक्षेत्रामधून जखमींना बाहेर काढणे यासारख्या विविध कामांमध्ये त्याचा उपयोग होईल.

7.62x51 मिमी हलक्या मशीन गन (LMG) आणि ब्रिज लेयिंग  टँकच्या (BLT) खरेदीच्या प्रस्तावालाही डीएसी ने मंजुरी दिली आहे. एलएमजीच्या समावेशामुळे पायदळाची लढाऊ क्षमता वाढेल, तर बीएलटीच्या समावेशामुळे यांत्रिकी दलाची हालचाल जलद होईल. शक्ती प्रकल्पा अंतर्गत भारतीय लष्करासाठी युद्ध क्षेत्रात वापरता येण्याजोगे मजबूत लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या खरेदीसाठीचे एओएन देखील मंजूर करण्यात आले आहे. ही सर्व खरेदी केवळ स्वदेशी विक्रेत्यांकडूनच केली जाईल.

भारतीय नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टरची परिचालन क्षमता वाढवण्यासाठी, डीएसी ने त्यासाठी शस्त्र खरेदीच्या एओएनला मंजुरी दिली आहे.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1951791) Visitor Counter : 112


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil