कायदा आणि न्याय मंत्रालय
ई कोर्ट प्रकल्पांतर्गत संगणकीकरण आणि वाइड एरिया नेटवर्क कनेक्टिव्हिटी
Posted On:
23 AUG 2023 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023
ई कोर्ट ( eCourts )प्रकल्पांतर्गत वाइड एरिया नेटवर्क (WAN) प्रकल्पाचा उद्देश OFC, RF, VSAT सारख्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून देशभरातील सर्व जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालय संकुलांना जोडणे हा आहे. मार्च 2023 पर्यंत, 2992 साइट्सपैकी 2976 साइट्स 10 Mbps ते 100 Mbps बँडविड्थ स्पीड सह (99.5% साइट्स पूर्ण ) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. देशभरातील न्यायालयांमध्ये डेटा कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणार्या eCourts प्रकल्पाचा हा कणा आहे.

eCourts प्रकल्पांतर्गत अनेक न्यायालये दूरवरच्या दुर्गम भागात आहेत, त्यांना तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नसलेली साईट्स (TNF) असे म्हणतात, जिथे संवाद केबल वापरता येत नाही. RF, VSAT, सबमरीन केबल सारख्या पर्यायी माध्यमांचा वापर करून साइट्स जोडल्या जात आहेत. विविध हितधारकांशी समन्वय साधून, विभागाने 2019 मधील एकूण 58 TNF साइट्सची संख्या 2022 मध्ये कमी करण्यात यश मिळवले आहे . परिणामी, सरकारच्या तिजोरीतील 95.45 कोटी रुपयांची बचत झाली आहे. या साइट्ससाठी कार्य आदेश जारी करण्यात आले आहेत. कोविड-19 परिस्थितीमध्ये, या WAN कनेक्टिव्हिटीने उत्तम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा तसेच सुलभ न्यायप्रक्रिया सुनिश्चित केली आहे.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1951424)
Visitor Counter : 119