नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी देशाच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी विविध देशातल्या भारतीय राजदूतांना केले आवाहन

Posted On: 22 AUG 2023 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023

भारतीय सागरी उद्योगाच्या वाढीच्या शक्यतांवर चर्चा करताना, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी देशांतर्गत सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी पूर्व आणि पश्चिम विभागातील सर्व भारतीय राजदूतांना आमंत्रित केले.

या बैठकीत अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, सिंगापूर, रशिया, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया, कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, नेदरलँड्सब्राझीलसह 45 हून अधिक भारतीय दुतावासांचा  समावेश होता. या बैठकीत  सागरी उद्योगाच्या  उत्कृष्टतेसाठी सहकार्य आणि वचनबद्धतेचे उल्लेखनीय प्रदर्शन पाहायला मिळाले.  कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स, बिम्सटेक, मध्यपूर्व,आखाती आणि पूर्वेकडील इतर शेजारी देशांमधील भारतीय दुतावासांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

सोनोवाल यांनी आगामी ग्लोबल मेरिटाईम इंडिया समिट (GMIS) 2023 कडे लक्ष वेधले आणि जगभरातील विविध देशांमधील संबंधित सरकारे आणि उद्योग जगताकडून सहभाग वाढवण्यासाठी राजदूतांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सकल देशांतर्गत  उत्पादनाच्या   दृष्टीने भारताची पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि क्रयशक्तीची तुलना केल्यास जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आल्यावर सोनोवाल यांनी स्वयंचलित मार्गांद्वारे येणाऱ्या 100% थेट परकीय गुंतवणुकीच्या वचनबद्धतेद्वारे वैशिष्ट्यीकृत सागरी क्षेत्रामध्ये देशाच्या  प्रगतीचे भाष्य केले.

10 लाख कोटी रुपये (12,000 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स ) पेक्षा जास्त संभाव्य गुंतवणुकीसह, आम्ही आर्थिक परिवर्तन घडवून आणू शकतो.

नील अर्थव्यवस्थेवर भर देत सोनोवाल यांनी विविध उद्योगांमध्ये सहभागी होत  विकासासाठी एक विस्तृत व्यासपीठ तयार करण्यासाठी  गुंतवणूकदारांना आमंत्रित केले.

सहकार्याच्या शक्यतासंदर्भात बोलताना सोनोवाल यांनी भारताने यापूर्वीच 34 देशांसोबत सागरी वाहतूक आणि सहकार्याबाबत द्विपक्षीय करार आणि सामंजस्य करार केले आहेत आणि 40 देशांसोबत खलाशांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत असे सांगितले .

ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (जीएमआयएस), 2023 बद्दल:

जीएमआयएस 2023 हा भारताच्या सागरी क्षेत्रात संधी शोधण्यासाठी, आव्हाने समजून घेण्यासाठी आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी उद्योगातील महत्त्वाच्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी एक प्रमुख सागरी क्षेत्र केंद्रित कार्यक्रम आहे. जागतिक स्तरावर आपली उपस्थि ती दर्शविण्यासाठी आणि भारताच्या सागरी उद्योगावर प्रकाश टाकण्यासाठी सज्ज असलेला मेरीटाइम इंडिया समिट आता या वर्षी  'जागतिक' मेरिटाइम इंडिया समिट म्हणून  विकसित झाला  आहे. 17 ते 19 ऑक्टोबर 2023 दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे ही शिखर परिषद होणार आहे.

संपूर्ण अजेंडा आणि नोंदणीच्या तपशीलांसह ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट 2023 बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया www.maritimeindiasummit.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1951200) Visitor Counter : 153


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu