इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारत - अमेरिका यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय - एनएसएफ यांच्यातील संशोधन सहकार्याअंतर्गत प्रस्ताव पाठवण्याचे पहिल्यांदाच संयुक्त आवाहन

Posted On: 21 AUG 2023 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंत्रालयाच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन सोबतच्या संशोधन सहकार्यासंदर्भात प्रस्तावासाठी पहिल्यांदाच संयुक्त आवाहन केले  आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि एनएसएफ यांच्यात संशोधन सहकार्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेसंदर्भात मे 2023 मध्ये करार करण्यात आला. हा सहकार्य संशोधन करार विशेषतः परस्पर हिताचे शोध आणि नवोन्मेष यावर भर देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2023 मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारत-अमेरिका संयुक्त निवेदनात हा करार अधोरेखित करण्यात आला होता.

ह्या पहिल्या संयुक्त आवाहनात, सेमीकंडक्टर संशोधन, नेक्स्ट जनरेशन (अत्याधुनिक) संपर्क विषयक तंत्रज्ञान/नेटवर्क/ प्रणाली, सायबर सुरक्षा, शाश्वतता आणि हरित तंत्रज्ञान आणि इंटेलिजन्ट वाहतूक व्यवस्था या क्षेत्रांशी संबंधित प्रस्ताव विचारार्थ घेतले जातील. प्रस्ताव पाठवण्याची सुरुवात 21 ऑगस्ट 2023 पासून करता येणार असून प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2024 आहे. तंत्रज्ञानाचा विकास या संयुक्त उपक्रमाअंतर्गत, प्रोटोटाइपचा विकास, प्रायोगिक स्तरावरील प्रात्यक्षिके, फील्ड वरील कामे आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाची गती वाढवणे ही कामे केली जातील. अमेरिका आणि भारताच्या संशोधकांच्या प्रस्तावित चमूना त्यांच्या प्रकल्पांच्या यशासाठी संसाधने आणि कौशल्ये उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञान चाचणी प्रदाते, स्थानिक समुदाय आणि उद्योग भागीदारांसह योग्य भागीदारी विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अलकेश कुमार शर्मा आणि एनएसएफचे संचालक डॉ. पंचनाथन, यांनी आज संयुक्तपणे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव  भुवनेश कुमार आणि अमेरिकन दूतावासाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950896) Visitor Counter : 123