विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर (CMERI)ने विकसित केलेल्या CSIR Prima ET11 या पहिल्या स्वदेशी ई ट्रॅक्टरचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते अनावरण, कृषिक्षेत्रात नवनवीन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2023 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2023
भारतीय अर्थव्यस्थेतील कृषी स्टार्ट अप्स ची भूमिका अधोरेखित करून कृषिक्षेत्रात नवनवीन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केले आहे. केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर (CMERI),ने विकसित केलेल्या CSIR Prima ET11 या पहिल्या स्वदेशी ई ट्रॅक्टरचे यांच्या हस्ते आज अनावरण झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कृषिक्षेत्रात एकीकडे नव्याने येऊ पाहणाऱ्या स्टार्ट अप्स ची संख्या वाढत असून त्याचप्रमाणे ई-ट्रॅक्टर, कचरा पुनर्वापर, ठिबक सिंचन, आंबा आणि कमळ यांसारखी जीनोम अनुक्रमित शेती अशा विशिष्ट तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
"हे एक असे क्षेत्र आहे ज्यात भारताने अद्याप आवश्यक ती गती घेतलेली नाही, हा एक भव्य अनभिज्ञ स्रोत असून तो केवळ भारताकडेच आहे " असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. जे देश माहिती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहेत, ते त्यांच्या दृष्टिकोनातून तसे करत आहेत कारण त्यांची मालमत्ता तीच आहे, आपल्याप्रमाणे कृषी मालमत्ता त्यांच्याकडे नाही, त्यामुळे आपल्याला त्यांचे अंधानुकरण करण्याची आवश्यकता नाही." असे त्यांनी सांगितले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी शासकीय वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये आयोजित केलेल्या संशोधन आणि विकास प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी 5 S चा मंत्र दिला - शोकेसिंग, स्टेकहोल्डर्स, स्टार्टअप्स, सिनरजायझिंग आणि स्ट्रॅटेजाइझिंग इंडस्ट्री लिंकेज म्हणजेच सादरीकरण, भागधारक, स्टार्ट अप्स, समन्वय आणि उद्योगांमध्ये संलग्नता आणण्यासाठी धोरण हे आहेत.
"जोपर्यंत आपण हे पाच घटक कृतीत आणणार नाही, तोपर्यंत आपण सर्वोत्कृष्ट परिणाम गाठू शकत नाही" असे ते म्हणाले.
एकीकृत दृष्टीकोनाची गरज अधोरेखित करत डॉ जितेंद्र सिंह यांनी संबंधित मंत्रालयांसह सर्व भागधारकांमध्ये योग्य समन्वय साधण्याचे आवाहन केले आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या प्रयोगशाळा आणि उद्योगांमध्ये अधिक व्यापक दुवा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. गुंतवणुकीला प्राधान्य देण्यासाठी एका स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी मांडला.

अमृत काळात भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येत असताना कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असेल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे असे , डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
आगामी पंचवीस वर्षात शासकीय नोकऱ्यांव्यतिरिक्त उपजिविकेवर आधारित संधींवर अधिक भर दिला जाईल, कृषी क्षेत्र हे केवळ अर्थव्यस्थेचा एक महत्वाचा भाग नव्हे तर तरुणांसाठी हा व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग असेल,” असे सिंह यांनी सांगितले.

* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1950879)
आगंतुक पटल : 189