युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा 20 (Y20) शिखर परिषदेची आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे झाली यशस्वी सांगता


युवा 20 परिषदेच्या घोषणापत्रावर यशस्वीरित्या झाली एकमताने स्वाक्षरी

Posted On: 20 AUG 2023 9:24PM by PIB Mumbai

 

G20 अध्यक्षपदाच्या एकूण रचनेला अनुसरुन, Y20 भारत प्रतिबद्धता गटाच्या बैठकीची आज 20 ऑगस्ट 2023 रोजी वाराणसीमध्ये यशस्वी सांगता झाली.

भारताच्या अध्यक्षतेखालील G20 च्या परिषदेच्या एकंदर रचनेचा एक भाग म्हणून, Y20 ने, जगासाठी नवीन मार्ग आखून दिले आहेत.  या बैठकीदरम्यान, Y20 च्या  घोषणापत्रातील मुद्द्यांवर चर्चा झाली आणि वाटाघाटी करण्यात आल्या. त्यानंतर, सर्वानुमते सहमतीने त्यावर यशस्वीरित्या स्वाक्षरी झाली.

यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रमुख शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत -

o    सतत शिकत राहण्याची प्रवृत्ती आजीवन जोपासणे.

o    जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक कार्यबळ तयार करणे

o   संशोधन कार्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बुलंद करणे

o    गिग कामगारांच्या  अधिकारांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे

o    चिरकालीन वित्तीय सहाय्य आणि मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध करणे.

रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये शेवटच्या दिवशी एक पूर्ण सत्र आयोजित करण्यात आले होते.Y20 भारताचे प्रतिनिधी म्हणून  शरद विवेक सागरअनमोल सोवितसमन्वय प्रमुख म्हणून पथिकृत पायने, Y20 भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख म्हणून फलित सिजारियाआणि Y 20 भारताच्या बैठक प्रमुख म्हणून  श्रीमती.  आदिती नारायणी पासवान, यांनी सत्राचे नेतृत्व केले.  Y20 चा विद्यमान अध्यक्ष म्हणून भारत आणि आयोजन समितीचे प्रतिनिधी म्हणून इंडोनेशिया तसेच ब्राझील यांचा समावेश असलेल्या, तीन देशांच्या गटाने, Y20 2023 चे घोषणापत्र जारी केले.  Y20 चा विद्यमान यजमान म्हणून भारताकडून, पुढील बैठकीचा यजमान म्हणून ब्राझीलच्या प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुखाकडे ध्वज अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला

वाय 20 घोषणापत्रकाच्या  स्वरूपात  गेल्या काही महिन्यांत झालेल्या विविध चर्चेच्या निष्कर्षातून निघालेल्या शिखर बैठकीतील  फलनिष्पत्तीवर  शिष्टमंडळाच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केली. वाय 20 च्या निर्धारित पाच संकल्पनांमधील  सामूहिक समान दृष्टीकोनाची  ही  एक साक्ष  असून हे तरुणांचा आवाज जागतिक व्यासपीठावर उच्च-स्तरीय निर्णयकर्त्यांद्वारे ऐकला जाईल हे सुनिश्चित करेल.

4 दिवसांच्या शिखर बैठकी दरम्यान, प्रतिनिधींनी सारनाथ, प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर आणि नदी पर्यटना  दरम्यान गंगा घाटाला भेट दिली.भारतातील समृद्ध कला, संस्कृती आणि वारसा यांनी जगभरातील प्रतिनिधींवर अविस्मरणीय  छाप उमटवली. वाराणसी या पवित्र शहराचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा; तेथील अध्यात्म, साहित्य, कला आणि संगीत यांनी जी 20 देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांतील प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले.

युवा 20 (वाय 20) शिखर बैठक  -2023 च्या आयोजनाची  जबाबदारी भारत सरकारच्या युवा व्यवहार विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडे सोपविण्यात आली होती.नवी दिल्लीतील वाय 20 पूर्वरंग कार्यक्रम , गुवाहाटीमधील प्रारंभिक बैठक , लेह, लदाख येथील वाय 20 पूर्व -शिखर बैठक , देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये 14 वाय 20 सल्लामसलत आणि भारतीय उद्योग महासंघ (सीसीआय) आणि विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणालीच्या  (आरआयएस)  माध्यमातून प्रत्येकी 50 विचारमंथन सत्रे  यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

***

N.Chitale/A.Save/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1950676) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu