श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जून 2023 मध्ये 20.27 लाख नवीन कर्मचारी राज्य विमा योजनेशी (ईएसआय) जोडले गेले


नवीन नोंदणीमध्ये 25 वर्षे वयोगटातील 9.77 लाख तरुण कर्मचाऱ्यांचा समावेश

Posted On: 17 AUG 2023 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्ट 2023

 

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट अहवालामधून असे आढळून आले आहे की, जून 2023 मध्ये 20.27 नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेले आहेत.

जून 2023 मध्ये सुमारे 24,298 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे, त्यामुळे सुरक्षा कवचाची व्याप्ती वाढली आहे.

आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते की देशात तरुणांसाठी अधिक रोजगार निर्माण झाले आहे, कारण जून 2023 मध्ये महामंडळाशी जोडल्या गेलेल्या एकूण 20.27 लाख कर्मचार्‍यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 9.77 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी नवीन आहे, जी एकूण कर्मचार्‍यांच्या 48.22% आहे.

वेतनपट अहवालाचे लिंगनिहाय विश्लेषण दर्शवते की जून 2023 मध्ये महिला सदस्यांची एकूण नोंदणी 3.87 लाख इतकी होती. जून 2023 मध्ये एकूण 71 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनीही  कर्मचारी राज्य विमा योजने (ईएसआय)अंतर्गत नोंदणी केल्याचे आकडेवारी दर्शविते.

यावरून असे दिसून येते की, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आपला लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे.

डेटा निर्मिती ही अखंड प्रक्रिया असल्यामुळे, वेतनपट अहवाल तात्पुरता आहे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950017) Visitor Counter : 119


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi