पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या निर्यातीत वेगाने वाढ, जागतिक मानांकन संस्थांद्वारे भारताच्या क्षमतेची घेतली जाऊ लागली आहे दखल: पंतप्रधान


भारतीय युवकांनी देशाला जागतिक स्टार्टअप पहिल्या पहिल्या तीन स्थानांमधे पोहोचवले: लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान

Posted On: 15 AUG 2023 5:32PM by PIB Mumbai

भारताची निर्यात वेगाने वाढत आहे आणि सारे जग म्हणत आहे की भारत आता थांबणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज 77 व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करत होते. जागतिक मानांकन संस्था भारताचे कौतुक करत आहेत. कोरोनानंतरच्या नव्या जागतिक रचनेत भारतीयांची क्षमता स्वीकारली जात आहे असे ते म्हणाले. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती, त्यावेळी मानवी गरजांवर लक्ष केंद्रित करूनच उपाय शोधले जाऊ शकतात हे आपण जगाला दाखवून दिले असेही ते म्हणाले. भारत आज विकसनशील देशांचा (ग्लोबल साउथ) आवाज बनला आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था आता जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनली आहे. यामुळे त्या पुरवठा साखळीला स्थिरता लाभते असे पंतप्रधानांनी सांगितले.

***

S.Thakur/V.Ghode/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1949300) Visitor Counter : 107